रहते हैं कुछ लोग ख़ामोश,लेकिन उनके हुनर बोलते हैं; लांडगेंना समज अन् अजित पवारांना टोला
आमच्या लांडगे दादांची जरा चिडचिड होते. परंतु, दादा ते बोलले असतील तरी तुम्ही काही चिडचिड करू नका असं सीएम फडणवीस म्हणाले.
महानगरपालिकांचा प्रचार रंगात आला आहे. (Pune) सर्वच पक्षाच्या नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यातील महत्वाच्या शहरांची सत्ता आपल्या हाती असावी यासाठी सर्वच नेते धावपळ करत आहेत. आज पिंपरी चिंचवडमध्ये बोलतना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांडगे आणि अजित पवार यांच्या कथित वादावर भाष्य केलं आहे. मिलेगी परिंदों को मंज़िल ये उनके पर बोलते हैं, रहते हैं कुछ लोग ख़ामोश,लेकिन उनके हुनर बोलते हैं असं म्हणत लांडगे यांची एकप्रकारे फडणवीस यांनी समजूत घातली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, आमच्या लांडगे दादांची जरा चिडचिड होते. परंतु, दादा ते बोलले असतील तरी तुम्ही काही चिडचिड करू नका. जरा समजून घ्या. तुम्ही काम केलय. तुम्ही फक्त काम सांगा. समोरच्या लोकांनी काही काम केलं नाही त्यामुळं त्यांच्याकडं काही सांगायला नाही. त्यामुळे इतकं काम केलं आहे की ते सांगायला गेलं तर कुणालाच उत्तर देण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे असल्या वादावादीत पडू नये असं मला वाटत असं म्हणत फडणवीस यांनी नाव न घेता अजित पवार यांनाही टोला लगावला आहे.
VIDEO : उंटावरून शेळ्या हाकू नको; आमदार महेश लांडगेंचे अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर
लांडगे यांचा आरोप
काही लोक एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी नागरिकांना धमकी देतायेत. जणू हे स्वतःच्या जागेवर घरं बांधत आहेत. हे सगळं इथला एक नेता आहे, त्याला वाटतं तो एसआरए चा बाप आहे. तो जे करतोय ते चुकीचं आहे. तो स्वतःला बाप समजतात, त्यांना जागा दाखवायला हवी. जे एसआरए मध्ये जे घुसलेत त्यांना खूप माज आहे. देवा भाऊ त्यांचा बंदोबस्त लावावा लागेल असं लांडगे म्हणाले.
ज्यांनी (अजित पवार) आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले, त्यांना दोन दिवसांत उत्तर दिलय. भाऊ युतीत फक्त भाजपने इतरांचा सन्मान करायचा का? देवा भाऊ हे खोटं नरेटिव्ह पसरवत आहे. माझी त्यांच्या इतकी उंची नाही. माझी तेवढी कुवत नाही. माझ्यावर शिंतोडे उडवत आहे. याद्वारे भाजपला बदनाम करत आहेत. आम्हाला म्हणतात की माझे राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांशी माझे संबंध आहेत, त्यांच्याशी चांगलं जमतं असं सांगतायेत आणि स्वतःचे आरोप लपवून ठेवतायेत. देवा भाऊ आज पिंपरी चिंचवड करांना स्पष्ट कळू द्या असंही ते म्हणाले.
