MIT शाळा प्रशासनाविरोधात मनसेचे तीव्र आंदोलन; फी वाढ रद्द करण्यासाठी पालकांसह कार्यकर्ते रस्त्यावर

फी वाढीबाबत आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे

News Photo   2026 04 04T210922.026

शहरातील नामांकित एमआयटी (IT) शिक्षण संस्थेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेने तीव्र आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या विविध तक्रारी फी वाढ व प्रशासनाच्या धोरणांविरोधात मनसेच्या विद्यार्थी सेनेने केलेल्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मागील तीन वर्षापासून ३० ते ३५ टक्के फी वाढवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विद्यार्थी आणि पालकांच्या खिशावर दरोडा टाकणे बंद करावे, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला.

बारामती अन् राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाही? काँग्रेस उतरणार मैदानात, पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयटी विश्वशांती गुरूकुल शाळा प्रशासनाने केलेल्या फी वाढीबाबत आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी मनसेच्या पाठिंब्याने आंदोलन करत शाळा प्रशासनाला जाब विचारला. यावेळी घोषणाबाजी करुन प्रशासनाविरोधात निषेध करण्यात आली. आंदोलनावेळी विद्यार्थी सेनेकडून नकली नोटांच्या बाग आणून प्रशासानाला शिक्षणाचे बाजारीकरण थांबवण्याची मागणी केली.

आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी इशारा देत सांगितले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन आणि पोलिस सतर्क होते.

follow us