दुसऱ्याचं डोकं वापरुन स्वतःच्या नावावर केला विश्वविक्रम!

दुसऱ्याचं डोकं वापरुन स्वतःच्या नावावर केला विश्वविक्रम!

पुणे : संपत मोरे (प्रतिनिधी)
जागतिक विक्रम (World record)करण्याचं खुळ जर का डोक्यात बसलं की, लोक काय डोकं लावतील याचं काहीच सांगता येत नाही. पुण्यात (Pune)सुद्धा असच काहीसं घडलंय… एका तरुणानं डोकं लावलं आणि साडेअठरा तासात सुमारे 540 लोकांची मोफत हेअर कटिंग (Free Hair Cutting)केली, तीही डाव्या हातानं… त्यामुळं त्यानं एकप्रकारे जागतिक विक्रमच प्रस्थापित केला आहे.

संतोष दत्तात्रय सुरवसे हे पुण्यातील कर्वेनगर (Karvenagar)भागातील आनंद मेन्स पार्लरचे संचालक आहेत. त्यांनी 19 मार्चला सकाळी मोफत हेअर कटिंगला सुरुवात केली होती. तब्बल साडेअठरा तास म्हणजेच रात्री साडेतीन वाजेपर्यंत 540 जणांची डाव्या हातानं हेअर कटिंग करून अनोखा जागतिक विश्वविक्रम केलाय.

संजय राऊत 100 दिवस जेलमध्ये राहिले, कैद्यांचीच.. बावनकुळेंचा खोचक टोला

त्यांच्या या रेकॉर्डची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड(Guinness Book of World), लिम्का बुक(The Limca Book), इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (India Book of Records)आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड (International Book of Records)घेणार आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया त्यांनी केली आहे. यापूर्वी जागतिक विश्व विक्रम हा लंडनमधील नाबी स्यालेही या हेअर स्टाइलरच्या नावावर 24 तासात 526 चा रेकॉर्ड आहे.

संतोष सुरवसे यांनी केलेल्या या रेकॉर्डमध्ये 540 जणांची हेअर कटिंग करुन दिली आहे. तेही ज्यांना ज्या प्रकारची हेअर स्टाईल हवी आहे, त्या प्रकारची हेअर स्टाईल करून दिली. त्यांचे दुकान महाविद्यालयाच्या परिसरात असल्यामुळे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात सलूनमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले.

सकाळी साधारण नऊ वाजता सुरु झालेली कात्री दुसऱ्या दिवशी रात्री साडेतीन वाजता थांबली. तेव्हा त्यांनी 540 जणांच्या मोफत हेअर कटिंग करून दिल्या आहेत. संतोष सुरवसे यांनी हा एक आगळावेगळा विक्रमच केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube