प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं काढला विजय ढुमेचा काटा, प्रेयसीसह पाच जणांना अटक

प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं काढला विजय ढुमेचा काटा, प्रेयसीसह पाच जणांना अटक

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील सिंहगड रोड परिसरात लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांची डोक्यात लोखंडी सळईने वार करत निर्घृण खून करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांतच छडा लावला आहे. सिंहगड पोलिसांनी (Sinhagad Police) ही हत्या झाल्यानंतर आपल्या तपासाची चक्रे फिरवत प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

ज्याला मच्छर आणि मुंगी चावल्यानंतर खाजवायला दुसऱ्याची नखे…; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने विजय ढुमे याचा त्याच्याच प्रेयसीने नवीन प्रियकराच्या मदतीने खून करत काटा काढला आहे. सुजाता समीर धमाळ (रा. किरकटवाडी), संदीप दशरथ तुपे (23, रा. राहू, इंदापूर), सागर संजय तुपसुंदर (19, रा. सहकारनगर), प्रथमेश रामदास खंदारे (28, उंड्री पिसोळी) व अन्य एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथके तयार केली होती. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 60 ते 70 सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांना पकडले आहे.

सुजाता या महिलेचे ढुमे यांच्याशी जुने प्रेमसंबंध होते, तिचीही चौकशी करण्यात आली. पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने तिचा नवीन प्रियकर संदीप दशरथ तुपे याच्यासोबत ढुमेच्या हत्येचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, संदीप तुपे यांच्यावर टेंभुर्णी, इंदापूर आणि हिंजवडी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहाय्यक पोलीस फौजदार आबा उतेकर, सतीश नागुल, सुनील चिखले, कॉन्स्टेबल संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, सागर शेडगे, अविनाश कांडे, राहुल ओळेकर, शिवाजी क्षीरसागर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील यांच्या पथकाने आरोपींना पकडले. सोमवारी म्हणजेच उद्या या आरोपींना पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube