पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीतच रस्सीखेच, सुनेत्रा पवारांपुढे मोठा पेच

Local Self-Government Legislative Council साठी पुणे राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याने सुनेत्रा पवारांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

Sunetra Pawar

War within NCP for Local Self-Government Legislative Council big dilemma awaits Sunetra Pawar : राज्यातील आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेच्या राजकारणाला वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तब्बल 17 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामध्ये आता पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या चार माजी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

…तर भाजप अहिल्यानगरची जागा स्वबळावर जिंकेल; विधानपरिषेसाठी ‘या’ नावांची चर्चा 

एकीकडे पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या एका जागेवर भाजपकडून दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या चार माजी आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. यात दोन ग्रामीण आणि दोन शहरी माजी आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये शहर विरूद्ध ग्रामीण असं विभाजन झालं आहे.

पुण्यात छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय ?

दरम्यान अगोदर शहरी भागाला आमदारकी मिळालेली असल्याने आता ग्रामीन आमदार असावा असा आग्रह धरला जात आहे. तर शहरातून पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपामध्ये पक्षाला मजबूत करण्यासाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेवर शहरातून आमदार असावा असा आग्रह शहरातील माजी आमदारांनी धरला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

follow us