पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरूवारी शहरातील पाणी पुरवठा बंद असणार, मनपाचा निर्णय
Water supply in Pune city पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. पालिकेकडून गुरुवारी 24 तासांसाठी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे
Water supply in Pune city will be closed on Thursday, says the Municipal Corporation : राज्यामध्ये एकीकडे उन्हाचा कडाका वाढलेला असताना दुसरीकडे पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणे महानगरपालिकेकडून गुरुवारी 24 तासांसाठी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात पुढील चार दिवस विजा, गारपीट अन् वादळी पावसाचे; हवामान विभागाने दिला इशारा
याबाबत पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली. त्यानुसार बुधवारी रात्री बारा वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्याचबरोबर शुक्रवारी उशिरा हा पाणीपुरवठा सुरू होईल. तो देखील कमी दाबाने असेल. असे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग स्टेशन आणि टाक्यांवर तातडीची दुरुस्ती व देखभाल हे काम महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
‘गोंधळ’च्या दिग्दर्शकाची नवीन कलाकृती!‘आभाळवृक्ष‘ लघुकथेचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित
या दुरुस्तीच्या कामांमध्ये पर्वती येथील नवीन आणि जुने जलशुद्धीकरण केंद्र, वडगाव जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, भामा आसखेड जलकेंद्र तसेच खडकवासला जॅकवेल या ठिकाणी हे काम करण्यात येणार आहेत.
काही राशींना संधीच संधी तर काहींना प्रतिकुल दिवस! कसं आहे आजचं राशीभविष्य जाणून घ्या…
त्याचबरोबर राज्यामध्ये उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विविध धरणांतील पाणी पातळी कमी होत चालली आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्याच्या जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला 15 टक्के पाणी कपातीची सुचना केली आहे. त्यानंतर महानगरपालिकेने हा प्रस्ताव स्विकारला आहे. त्यामुळे आता एक दिवस पाणी पुरवठा बंद किंवा दिवसा आड पाणी पुरवठा करण्याची शक्यता आहे.