खेडची गावे पिंपरीत नको म्हणणारे माजी आमदार दिलीप मोहिते चाकण महापालिकेसाठी आग्रही, कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडणार

पुढील मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतः चाकण महानगरपालिकेचा विषय मांडणार असल्याची घोषणा माजी आमदार मोहिते यांनी केली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 05T125636.066

Will Chakan become a municipal corporation? : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दवाढीत खेड तालुक्यातील गावे समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला 2020 मध्ये विरोध करणारे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आता चाकण स्वतंत्र महानगरपालिका करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतः चाकण महानगरपालिकेचा विषय मांडणार असल्याची घोषणा आमदार मोहिते यांनी केली आहे. त्यामुळे चाकण स्वतंत्र महानगरपालिका होण्याच्या मागणीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे.

2020 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा विषय चर्चेत आला होता. त्यावेळी आळंदी, चिंबळी, कुरुळी, निघोजे, मोई, महाळुंगे, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी यांसह खेड तालुक्यातील काही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडेही पाठवण्यात आला होता.

मात्र, तत्कालीन परिस्थितीत माजी आमदार दिलीप मोहिते यांनी या हद्दवाढीला स्पष्ट विरोध दर्शवला होता. खेड तालुक्यातील एकही गाव पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्याऐवजी चाकण आणि आळंदी परिसरातील गावांचा समावेश करून स्वतंत्र महानगरपालिका निर्माण करावी, अशी मागणी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्याचे जाहीर केले होते.

तिसऱ्या अपत्यामुळे राम शिंदेंना बसलेला नियम कालबाह्य होणार? SC च्या भूमिकेने वाढवली उत्सुकता…

आता तब्बल सहा वर्षांनंतर याच मागणीसंदर्भात माजी आमदार मोहिते यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. चाकण परिसरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र महानगरपालिका हाच पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या स्वतः चाकण महानगरपालिकेचा विषय मांडणार असून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून संबंधित सर्वांशी या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

चाकणमधील प्रश्न सोडवण्यासाठी औद्योगिकीकरणाचा योग्य उपयोग होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतंत्र महानगरपालिका आवश्यक असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले. सरकारने महानगरपालिकेबाबत किमान घोषणा केली तरी पुढील प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी जाईल. मात्र, या निर्णयामुळे चाकणकरांचे कल्याण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चाकण परिसराचा विकास आराखडा अर्थात डीपी मंजूर होण्याची गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रतीक्षा आहे. मात्र, अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. स्वतंत्र महानगरपालिका स्थापन झाल्यास मोठ्या प्रमाणावर विकास आराखडा तयार करता येईल आणि परिसरातील प्रलंबित नागरी प्रश्न सोडवण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही मोहिते यांनी सांगितले.

Video : मुख्य सूत्रधाराला वाचवलं जातंय? प्रदीप पूर्णेकर प्रकरणात अविनाश जाधवांचा गंभीर आरोप

विशेष म्हणजे, आचारसंहिता संपल्यानंतर चाकण महानगरपालिकेचा विषय मंत्रिमंडळात मांडण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्याला सांगितले असून, यासंदर्भात सर्वांशी चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे चाकण महानगरपालिकेच्या प्रस्तावाबाबत आता राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे खेड तालुक्यासह चाकण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 2020 मध्ये पिंपरी-चिंचवडच्या हद्दवाढीला विरोध करत चाकण-आळंदी स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी करणारे माजी आमदार दिलीप मोहिते आता प्रत्यक्ष मंत्रिमंडळात हा विषय मांडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी मांडलेली स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी आता प्रत्यक्षात येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us