पुणे जिल्ह्यातील बिबटे वनताराला जाणार ? पुणे जिल्ह्यातील बिबट्याचा प्रश्न मंत्रालयात पोहोचला…

leopards : पालकमंत्री अजित पवार आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी धाव न घेतल्यान मंत्रालयातील बैठकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातलाय.

  • Written By: Published:
Leopards In Pune District Go To The Vantara Forest

Will leopards in Pune district go to the Vantara forest: मागच्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे. काही दिवसांच्या काळातच बिबट्याने 3 जणांचा (leopards) जीव घेतला, नुकतंच शिरूर मधील पिंपरखेड गावात अवघ्या 13 वर्षांच्या रोहन बोंबे या मुलाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ प्रचंड संतापले. 15 दिवसांच्या काळातच आजूबाजूच्या परिसरातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वनविभागाचे वाहन पेटवून दिले, तसेच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोको करण्यात आला होता.


तिघांचे जीव गेलेते; ग्रामस्थांचा तीव्र संताप

आता रास्तारोको आंदोलन थांबवण्यात आलं असलं तरी शेवटच्या बिबट्याचा बंदोबस्त लागेपर्यंत यापुढं ही वेगवेगळ्या मार्गाद्वारे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय. या संदर्भात वनमंत्रांच्या नेतृत्वाखाली बैठकही आयोजित करण्यात आली होती. आता एक बिबट्या जेरबंद करण्यात आलाय, पण तोच नरभक्षक बिबट्या असल्याची खात्री नसल्यानं इतर बिबट्याचं काय? हा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. तर आजवर पालकमंत्री अजित पवार आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी धाव न घेतल्यान मंत्रालयातील बैठकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातलाय. आता आंदोलनाची पुढची दिशा काय असेल. सरकारला बिबट्या जगवायचा आहे की माणूस जगवायचा आहे? असा खडा सवाल पुण्यातील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. (leopards in Pune district go to the Vantara forest)


दिवाळी फराळातून राजकीय गणितांची मांडणी…, आगामी निवडणुकांसाठी इच्छुकांची चाचपणी 


बाराशे बिबट्यांपैकी किती बिबटे वनताराला पाठविणार ?

दुसरीकडे पुण्यातील सर्व बिबटे गुजरातच्या वनतारासह (Vantara forest) विविध राज्यात वन क्षेत्रात पाठवायचे, तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांच्या बैठकीत झालाय. पण शेतकऱ्यांना या निर्णयावर विश्वास नाही, बाराशे बिबट्यांपैकी किती बिबटे पाठवणार? फक्त शंभर? उर्वरित बिबट्यांचे काय? इथले बिबटे वनतारामध्ये पाठवले, याचा पुरावा कोण देणार? त्यामुळं आम्हाला या आश्वासनावर विश्वास नाही. अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलीये, आता सरकार या गंभीर प्रश्नावर काय नेमका तोडगा काढतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Video : रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या काळात सर्व अधिकारीच त्यांचे कार्यकर्ते; रामराजेंचा थेट घणाघात


बिबट्याचा प्रश्न राज्य आपत्ती जाहीर करा-खासदार डॉ. अमोल कोल्हेंची मागणी

पिंपरखेड येथील घटना दुर्देवी आहे. जुन्नर तालुक्यातील बालकाचा असाच मृत्यू झाला आहे. बिबट मानव संघर्ष कमी करण्यासाठी प्रजननावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. मादी नसबंदीचा प्रस्ताव केंद्राला सादर झाला आहे. त्यासाठी पाठपुरावा होत असल्याचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी म्हटलंय. एका वनक्षेत्रातील 115 बिबट मादीचे प्रजनन नियंत्रण करायचे आहे. जुन्नर तालुक्यातील काही बिबट काही वनताराला स्थलांतर करता येईल का ? कसा प्रस्ताव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली आहे. ही राज्य आपत्ती घोषीत झाली पाहिजे. एक वनक्षेत्रात एक हजार बिबट आहेत. त्यासाठी कर्मचारी व यंत्रणा हवी आहे. मी मुख्यमंत्री यांना याबाबत विनंती केली आहे. यासंदर्भात ठोस कृत्री आराखडा तयार केला पाहिजे. केरळने हत्ती आणि मानव संघर्षासाठी राज्य आपत्ती जाहीर केली आहे. येथे लहान मुलांना जीव गमवावा लागत आहे. मुख्यमंत्री यांनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा आहे. यासाठी ठोस कृत्री आराखडा तयार करावा लागणार आहे. लवकर बैठक घेऊन कृती आराखडा तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केलीय.

follow us