95 वर्षीय आज्जीनं पोलंडमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकून रचला इतिहास

95 वर्षीय आज्जीनं पोलंडमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकून रचला इतिहास

नवी दिल्ली : भारताच्या धावपटू आज्जी (India’s runner grandmother)भगवानी देवी डागरनं (Bhagwani Devi Dagar) पुन्हा एकदा इतिहास (History)रचला आहे. वयाच्या 95 व्या वर्षी आज्जीनं देशासाठी 3 सुवर्णपदकं (Three gold medals) जिंकली आहेत. पोलंड (Poland)येथे झालेल्या नवव्या जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिप 2023 (Ninth World Masters Athletics Indoor Championships 2023)मध्ये त्या आज्जीनं हे पदक मिळवलं आहे. या विजयानंतर देश-विदेशातून भगवानदेवीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वयाला न जुमानता आज्जीनं एका वर्षात अनेक स्पर्धांमध्ये 95 पदकं जिंकली आहेत. नजफगढ, दिल्ली (Delhi)येथील धावपटू आज्जी भगवान देवी डागर हिनं पोलंड येथे झालेल्या 9 व्या जागतिक मास्टर्स अॅथलीट इनडोअर चॅम्पियनशिप 2023 मध्ये तीन सुवर्णपदकं जिंकली आहेत.

भगवान देवी आज्जीनं 60 मीटर शर्यत, डिस्कस थ्रो आणि शॉटपुटमध्ये सुवर्णपदकं पटकावली आहेत. 2022 मध्ये फिनलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर अॅथलीट इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये आज्जीनं तीन पदकं जिंकली होती. आता ही आज्जी सेलिब्रिटी बनली आहे. या आज्जीचं देशभरातून कौतुक होत आहे.

“उर्फी जावेदशी तुलना केल्याने” व्हायरल गर्लने व्यक्त केला संताप, नेमकं प्रकरण काय?

तीन सुवर्णपदकं जिंकून मंगळवारी सकाळी भारतात परतलेल्या भगवान देवी डागरचे दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजारो लोकांनी जल्लोषात स्वागत केले. धावपटू आज्जीला सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदकांबद्दल काहीच माहिती नाही. खेळात पिवळे पदक (सुवर्ण पदक) आणायचे असे तिने मनात ठरवले होते. तिने विमानतळावर पत्रकारांना सांगितले की, मी पिवळे पदक जिंकेल अशी मला खूप आशा होती.

आपल्या विजयाच्या रहस्याबद्दल बोलताना आज्जीनं सांगितलं की, आपण देशी तुपात शिजवलेले अन्न खाते. रोज संध्याकाळी उद्यानात फिरते. मी देशातील सर्व तरुणांना सांगू इच्छिते की खेळ खेळा, शर्यतीत धावा, इतर देशात जाऊन पदक जिंका आणि आपल्या देशाचा गौरव करा. मी कुठेही जाईन, आपण आपल्या देशासाठी नेहमीच सोने आणणार असल्याचेही यावेळी या अज्जीनं सांगितलं.

आज्जीची गेल्या वर्षी यू इन्स्पायर श्रेणीसाठी अप्रतिम उत्साह आणि 90 च्या पुढे आंतरराष्ट्रीय कामगिरीसाठी निवड झाली होती. महिलांच्या कामगिरीबद्दल आणि गेल्या दहा वर्षांपासून अपराजिता संस्था ज्या महिलांना आयुष्यात काहीतरी नवीन करू इच्छितात त्यांचा सन्मान तर करत आहेच, पण त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतही करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube