PF घोटाळा! टीम इंडियाचा स्टार खेळाडू रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी

  • Written By: Published:
PF घोटाळा! टीम इंडियाचा स्टार खेळाडू रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी

Arrest warrant has been issued against former Indian cricketer Robin Uthappa : क्रिकेट विश्वास खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आली असून, टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू रॉबिन उथप्पाविरोधाक अटक वॉरंट जारी करण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधी (पीएफ) फसवणूक केल्याप्रकरणी हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. सेंच्युरी लाइफस्टाइल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड चालवताना कर्मचाऱ्यांच्या पगारातून 23 लाख कापल्याचा आणि त्यांचे पीएफ योगदान रोखल्याचा आरोप उथप्पावर लावण्यात आला आहे.

पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी 4 डिसेंबर रोजी पोलिसांना उथप्पाविरुद्ध वॉरंट जारी करण्यास सांगितले, परंतु उथप्पाने पत्ता बदलल्यामुळे पोलिसांनी वॉरंट पीएफ ऑफिसला परत केले आहे. त्यानंतर आत अधिकारी त्याचा नवीन पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नियमांनुसार, कोणतीही कंपनी जी आपल्या कर्मचाऱ्यांचे पीएफ पॅकेट कापते, त्यांना हे पैसे त्यांच्या पीएफ खात्यात जमा करावे लागतात. तसे न झाल्यास ते कायद्याचे उल्लंघन आणि पैशाचा गैरवापर मानला जातो. उथप्पानेही तेच केले आहे. पोलीस त्यांना शोधण्यात व्यस्त आहेत.

सप्टेंबर २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारताकडून दीर्घकाळ खेळणारा आणि नंतर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून तुफानी फलंदाजी करणारा उथप्पाने सप्टेंबर २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो आता निवृत्त खेळाडूंच्या लीगमध्ये खेळताना दिसतो. अलीकडेच हाँगकाँग सिक्स स्पर्धेत त्याने भाग घेतला आणि उत्कृष्ट फलंदाजी केली. उथप्पाने भारतासाठी ४८ एकदिवसीय सामने खेळले असून ९३४ धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 90.59 राहिला आहे. उथप्पाने भारतासाठी एकूण १३ टी-२० सामने खेळले असून २४९ धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा अर्धशतके आणि एकदिवसीय सामन्यात एक अर्धशतक झळकावले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube