श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी औकिब नबी टीम इंडियात ! कोण आहे वेगवान गोलंदाज ?

Auqib Nabi : नबीने रणजी ट्रॉफीत एकूण 104 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये गेल्या वर्षाच्या एका सत्रात तब्बल ६० विकेट्सचा समावेश आहे.

  • Written By: Published:
AUQIB NABI

Auqib Nabi : जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबीची (Auqib Nabi) श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात प्रथमच निवड झाली आहे. त्याला जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी संघात मिळाले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून बुमराह जायबंदी झाला होता. तो श्रीलंका दौऱ्यासाठी तंदुरुस्त झाला नाही. त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले. 29 वर्षीय औकिब नबीने रणजी ट्रॉफीतील सलग दोन शानदार हंगामांतील कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळविले आहे.

रणजी ट्रॉफी गाजविली
नबीने रणजी ट्रॉफीत एकूण 104 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये गेल्या वर्षाच्या एका सत्रात तब्बल ६० विकेट्सचा समावेश आहे. या हंगामात त्याने जम्मू-काश्मीरला प्रथमच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. नबीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यासाठी इंडिया ‘A’ संघातही निवड झाली होती. श्रीलंका ‘A’ विरुद्ध झालेल्या दोन चार दिवसीय सामन्यांमध्ये त्याने सहा विकेट्स घेतल्या. यामध्ये पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात 58 धावा देत घेतलेल्या चार विकेट्सचा समावेश आहे.

कसोटी संघात स्थान मिळणारा पहिला खेळाडू
औकिब नबी हा काश्मीर खोऱ्यातील कसोटी संघात स्थान मिळवणारा पहिला खेळाडू ठरला आहे. नबी हा बारामुल्ला जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. २९ वर्षीय नबी हा भारताच्या वरिष्ठ संघात निवड झालेला जम्मू-काश्मीरचा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी परवेझ रसूल आणि उमरान मलिक यांना मर्यादित षटकांच्या भारतीय संघात स्थान मिळाले होते.फलंदाजीतही उपयुक्त योगदान देऊ शकतो.

श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बराड, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन आणि औकिब नबी.

follow us