AUS vs BAN : बांग्लादेशने रचला इतिहास ; ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला कसोटी विजय
AUS vs BAN : ऑस्टेलिया आणि बांग्लादेश यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वांना धक्का देत
AUS vs BAN : ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वांना धक्का देत बांग्लादेशने बाजी मारली आहे. या विजयासह बांग्लादेशने इतिहास रचला आहे. त्यांनी पहिल्यादांच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात कसोटी क्रिकेटमध्ये पराभव केला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसांपासून बांग्लादेशने मजबूत पकड मिळवली होती. या शानदार विजायसह बांग्लादेशन दोन सामन्यांच्या मालिकेत आता 1-0 ने आघाडी घेतली आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त 198 धावा करु शकला तर आपल्या पहिल्या डावात बांग्लादेशने 426 धावा करत तब्बल 228 धावांची आघाडी घेतली होती. तन्झिद हसनच्या 101 आणि नजमुल हुसेन शांतोच्या 84 धावांच्या जोरावर बांगलादेशने आघाडी घेतली होती. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 284 धावा करत हा सामना जिंकण्यासाठी बांग्लादेशला 56 धावांचं आव्हान दिलं होतं.
दिलासा, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
56 धावांचं आव्हान बांग्लादेशने 1 विकेट गमावून पूर्ण केलं. त्यांनी डार्विन येथील मरारा क्रिकेट मैदानावर झालेला पहिला कसोटी सामना 9 विकेट राखून जिंकला आहे. मोमिनुल हक (30*) आणि शादमान इस्लाम (25*) हे नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियन भूमीवर बांगलादेशचा हा पहिलाच कसोटी विजय आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकूण दुसरा विजय आहे. यापूर्वी 2017 मध्ये मीरपूर येथे त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला होता.
History made for Bangladesh as Mominul scores the winning runs against Australia 🤯#PlayoftheDay | @NRMAInsurance | #AUSvBAN pic.twitter.com/9LgSs0D4WJ
— cricket.com.au (@cricketcomau) August 16, 2026
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 284 धावांवर आटोपला. चौथ्या दिवशी यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरी (30), मिचेल स्टार्क (18), नॅथन लायन (15) आणि कर्णधार पॅट कमिन्स (8) यांनी फलंदाजीत योगदान दिले. कॅमेरॉन ग्रीनने शानदार खेळी करत शतक झळकावले. त्याने 201 चेंडूंत 104 धावा केल्या, ज्यामध्ये चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर बांग्लादेशकडून फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराजने 5 विकेट्स घेतले. तर वेगवान गोलंदाज हसन महमूदने तीन विकेट घेतले.