WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ-ट्रेव्हिस या फलंदाजांनी मोडला 111 वर्षाचा जुना ‘हा’ विक्रम

WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ-ट्रेव्हिस या फलंदाजांनी मोडला 111 वर्षाचा जुना ‘हा’ विक्रम

WTC Final 2023 : भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ) WTC चा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय टीमचा कप्तान रोहित शर्मा याने (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आधी ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली. या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेड(Travis Head) आणि स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) यांनी अप्रतिम खेळी खेळली. या दोघांनी 111 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. (Australia’s Smith-Head broke the 111-year-old record)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात 4 थ्या विकेटसाठी 285 धावांची भागीदारी झाली होती. या भागीदारीमुळे या सामन्यावर कांगारू संघाची पकड मजबूत झाली आहे. टॉस हारल्यानंतर कांगारू संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि 76 धावांवर 3 विकेट गमावल्या, मात्र, त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी 285 धावांची भागीदारी केली. आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमला संकटातून बाहेर काढले.

Shreyas Talpade: जितेंद्र जोशीनं सांगितलेली आठवण ऐकून श्रेयस झाला भावूक; म्हणाला, ‘स्वामींच्या मठात…’

WTC च्या अंतिम सामन्यात शतक झळकवणारा ट्रॅव्हिस हेड पहिला फलंदाज ठरला. त्याने 174 बॉलमध्ये 163 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने तब्बल 25 चौकार आणि 1 षटकार मारला. मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला माघारी पाठवलं.

तर स्टीव्ह स्मिथ याने 268 बॉलमध्ये 121 रण काढून जबरदस्त खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार मारले. शार्दुल ठाकूरने स्मिथला आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्मिथ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये शतक झळकवणारा दुसरा फलंदाज ठरला.

WTC इतिहासात आता ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ बनला आहे, ज्याच्या दोन फलंदाजांनी अंतिम सामन्यात शतक झळकवलं. हा एक जागतिक पराक्रम आहे. स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या आधी हा विक्रम वॉरेन बोर्डस्ले आणि चार्ल्स केलवे यांच्या नावावर होता. या दोन्ही खेळाडूंनी 1912 साली लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 242 धावांची भागीदारी केली होती.

याशिवाय शारजा क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरुद्ध रिकी पाँटिंग आणि मॅथ्यू हेडन यांच्यात 184 धावांची भागीदारी झाली होती. या दोन्ही खेळाडूंनी 2002 मध्ये हा पराक्रम केला होता. मात्र, आता ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी 111 वर्षे जुना विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube