BCCI ची मोठी घोषणा, मिनी लिलावाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी 10 संघ खर्च करणार तब्बल 237.55 कोटी

IPL 2026 Auction Date : क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या आयपीएल 2026 मिनी लिलावाबाबत बीसीसीआयने मोठी घोषणा करत तारीख जाहीर केली आहे.

  • Written By: Published:
IPL 2026 Auction Date

IPL 2026 Auction Date : क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या आयपीएल 2026 मिनी लिलावाबाबत बीसीसीआयने मोठी घोषणा करत तारीख जाहीर केली आहे. नुकतंच आयपीएलमधील सर्व 10 संघानी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यानंतर आता बीसीसीआयने मोठी घोषणा करत मिनी लिलावाबाबत तारीख जाहीर केली आहे.

बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2026 साठी होणारा मिनी लिलाव (IPL 2026 Auction Date) 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे होणार आहे. या लिलावात 10 संघांकडे 77 जागा शिल्लक आहेत आणि एकत्रित रक्कम 237.55 कोटी रुपये आहे. तर दुसरीकडे आयपीएल 2026 साठी 10 संघांनी 173 खेळाडू रिटेन केले आहे ज्यामध्ये विदेशी 49 आणि काही ट्रेंड केलेले खेळाडू असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

आयपीएल 2026 च्या हंगामासाठी खेळाडू राखीव ठेवण्याची विंडो 15 नोव्हेंबर 2025 रोजी बंद झाली होती, सर्व 10 फ्रँचायझींनी लिलावापूर्वी त्यांच्या राखीव खेळाडूंची पुष्टी केली आहे. संघांमध्ये एकूण 173 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये 49 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. एकूण 77 खेळाडूंच्या जागेसाठी लिलावात 237.55 कोटी रुपयांची एकूण रक्कम उपलब्ध असेल.

प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 25 खेळाडूंना रिटेन करता येत असल्याने पंजाब किंग्जने 21 खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जे 10 फ्रँचायझींपैकी सर्वाधिक आहे, तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सने प्रत्येकी 20 खेळाडूंना कायम ठेवले आहे. आयपीएल खेळाडूंचा लिलाव 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे होईल. चेन्नई सुपर किंग्जला 9 खेळाडूंवर बोली लावावी लागणार आहे. त्यांच्याकडे 43.4 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे.

November 16 Horoscope : मेष ते मीन आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी स्थिती

तर कोलकाता नाईट रायडर्स या वर्षीच्या लिलावात 64.3 कोटी रुपयांची सर्वात मोठी रक्कम घेऊन प्रवेश करणार आहे. आयपीएल 2026 साठी त्यांनी वेंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेल सारखे खेळाडूंना सोडले आहे.

follow us