भारताच्या ‘या’ खेळाडूविरुद्ध गुन्हा दाखल, कारण एेकूण व्हाल शॉक
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अंडर 19चा माजी कर्णधार विजय झोल याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे विजय झोल हा शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा जावई आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप विजय झोलवर करण्यात आला आहे. याप्रकरणी झोल याच्यावर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधिक माहिती अशी की, क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल यांनी गुंतवणूक केली, ज्यात या क्रिप्टो करन्सीच्या किंमती कमी झाल्या यामुळे झोल याने आपल्याला त्यात दोषी धरून मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटर विजय झोल आणि त्याचा भाऊ विक्रम झोल याच्यासह 15 जणांवर घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
किरण खरात यांनी 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांच्याकडून करण्यात आला आहे. आता याप्रकरणी झोल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
आमदार गोरंट्याल यांचे खोतकरांवर गंभीर आरोप
या प्रकरणावरुन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकर आणि झोल कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. खोतकर आणि झोल कुटुंबियांनी किरण खरात यांची सुपारी दिली. खोतकर आणि झोल यांच्यावर गुन्हा दाखल करा, मोक्का लावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं कैलास गोरंट्याला म्हणाले.