Korea Open: चिराग आणि सात्विकने रचला इतिहास, जगातील नंबर वन जोडीला नमवत पटकावले विजेतेपद

  • Written By: Published:
Korea Open: चिराग आणि सात्विकने रचला इतिहास, जगातील नंबर वन जोडीला नमवत पटकावले विजेतेपद

Chirag Shetty And Satwiksairaj Rankireddy:  कोरिया ओपनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या भारतीय जोडीने पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या पहिल्या क्रमांकाच्या जोडीचा 17-21, 21-13, 21-14 असा पराभव करून कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले. फाईलमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकिरेड्डी यांना फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो या जगातील नंबर वन इंडोनेशियन जोडीने आव्हान दिले होते. अंतिम फेरीच्या पहिल्या सेटमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांचा 17-21 असा पराभव झाला. (Chirag Shetty And Satwiksairaj Rankireddy Won The Title Of Korea Ope By Defeating World Number One Pair)

यानंतर दोघांनीही आक्रमकता दाखवत शेवटचे दोन सेट 21-13 आणि 21-14 असे जिंकले. तत्पूर्वी, भारतीय जोडीने गेल्या शनिवारी उपांत्य फेरीत लिआंग वेई केंग आणि वांग चांग या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या चिनी जोडीचा पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता रविवारी पहिल्या क्रमांकाच्या जोडीला पराभूत करत जेतेपद पटकावले आहे. भारतीय जोडी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इंटिमेट सीन अन् भगवद्गीता वाचन, Oppenheimer वादात; निर्मात्यांसह सेन्सॉरवर प्रेक्षक भडकले

उपांत्य फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांनी चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांचा 40 मिनिटांच्या गेममध्ये 21-15 आणि 24-22 असा जिन्नम स्टेडियमवर पराभव केला. सात्विक आणि चिराग यांचा चिनी जोडीवरचा हा पहिलाच विजय ठरला. याआधी भारतीय जोडीला चिनी जोडीसमोर दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले होते. या वर्षी, चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या जोडीने यापूर्वीच इंडोनेशिया सुपर 1000 आणि स्विस ओपन सुपर 500 विजेतेपद जिंकले आहेत.

सात्विक आणि चिरागच्या जोडीनं अनेक जेतेपदे पटकावली आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय थॉमस कपमध्येही भारतीय जोडीने सुवर्णपदक पटकावले. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक, सुपर 300 (सय्यद मोदी आणि स्विस ओपन), सुपर 500 (थायलंड आणि इंडिया ओपन), सुपर 750 (फ्रेंच ओपन) आणि इंडोनेशिया ओपन सुपर 1000 विजय मिळवला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube