श्रीलंकेचा डबल दणका! दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव; मालिकाही जिंकली

श्रीलंकेचा डबल दणका! दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव; मालिकाही जिंकली

SL vs NZ : गोलंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनानंतर कुसल मेंडिसच्या शानदार (SL vs NZ) अर्धशतकाच्या बळावर श्रीलंकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा (New Zeland) पराभव केला. या विजयाबरोबरच श्रीलंकेने तीन (Sri Lanka) सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली आहे. या सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला होता. त्यामुळे तीन ओव्हर कम करून 47 ओव्हर्सचा सामना करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 209 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने 7 विकेट गमावून 210 धावा केल्या.

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या कुसल मेंडिसने चांगली फलंदाजी केली. मेंडिस 74 धावा करून नाबाद राहिला. त्याने सहा षटकार लगावले. पाथुम निसांका आणि महेश तीक्षणा या दोघांनीही मोठे योगदान दिले. निसांकाने 28 तर तीक्षणाने 27 धावा केल्या. जेनिथ लियानाजने 22 आणि दुनिथ विलालागेने 18 धावा केल्या.

भारत-श्रीलंका सामना टाय तरीही सुपर ओव्हरच नाही; जाणून घ्या, नियम काय सांगतो..

न्यूझीलंडची फलंदाजी अपयशी

या सामन्यात न्यूझीलंडची फलंदाजी अपयशी राहिली. मार्क चापमॅन आणि विकेटकीपर फलंदाज मिच हेय यांच्या व्यतिरिक्त एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मार्क चापमॅनने 81 चेंडूत 76 धावा केल्या. मिच हेयने 62 चेंडूत 49 धावा केल्या. श्रीलंकेकडून महेश तीक्षणा आणि जेफरी वांडरसे या दोघांनी तीन-तीन विकेट घेतले. या व्यतिरिक्त फर्नांडोने दोन विकेट घेतल्या. दुनिथ वेलालागे आणि कर्णधार चरिथ असलंका या दोघांनी एक-एक विकेट घेतल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube