रोहित-कोहलीला डच्चू, हार्दिककडे कर्णधारपद

रोहित-कोहलीला डच्चू, हार्दिककडे कर्णधारपद

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयकडून न्युझीलंड विरूद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 सीरीजसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये टी20 साठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला डच्चू देण्यात आला आहे. तर टी20 टीमचा कॅप्टन हार्दिक असणार आहे.मात्र वनडेचा कॅप्टन रोहित शर्मा असणार आहे.

केएल राहुलला न्युझीलंड विरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. केएल राहुलला त्याच्या लग्नामुळे संघामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या जागी व्हिकेटकीपर केएस भरतला संधी देण्यात येणार आहे. अक्षर पटेल देखील वैयक्तिक कारणांमुळे संघामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. अक्षर पटेलच्या जागी शाहबाज अहमदला टीम इंडीयामध्ये स्थान देण्यात आले आहे. तर शार्दुल ठाकुरचे संघात पुनरागमण झाले आहे. तर घरगुती क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणाऱ्या मुंबईच्या पृथ्वी शॉला टी20 साठी संघामध्ये स्थान मिळाले आहे. बीसीसीआयने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली.

न्युझीलंड विरूद्ध होणाऱ्या वनडे सीरीजसाठीचा संघ :

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (व्हिकेटकीपर), हार्दिक पांड्या (व्हाईस कॅप्टन), वाशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

न्युझीलंड विरूद्ध होणाऱ्या टी20 सीरीजसाठीचा संघ :

हार्दिक पांड्या (कॅप्टन), सूर्यकुमार यादव (व्हाईस कॅप्टन), ईशान किशन (व्हिकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (व्हिकेटकीपर), वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube