अखेर कुस्ती महासंघाची निवडणूक जाहीर, जाणून घ्या नेमका वाद काय?

अखेर कुस्ती महासंघाची निवडणूक जाहीर, जाणून घ्या नेमका वाद काय?

Wrestling Federation : गेल्या काही दिवसांपासून वाद अडकलेल्या कुस्ती महासंघाच्या निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर होतील, असे निवडणूक अधिकारी निवृत्त न्यायमूर्ती एमएम कुमार यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ऑगस्टमध्ये केलेल्या मतदार यादीनुसार निवडणुका
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या रिट याचिकेच्या निकालावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. ही निवडणूक महासभेच्या विशेष सभेदरम्यान होणार असून, 15 ऑगस्ट रोजी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार होणार आहे.

PM मोदींच्या होमग्राऊंडमधूनच नितीश कुमारांचा शड्डू : वाराणसीतून फोडणार प्रचाराचा नारळ

निवेदनात म्हटले आहे की, “पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने 11 ऑगस्ट रोजी WFI निवडणुकांना स्थगिती दिली होती, त्यामुळे 12 ऑगस्ट रोजी निवडणुका होऊ शकल्या नाहीत.” सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली आहे आणि आता 21 डिसेंबरपासून उर्वरित निवडणूक प्रक्रिया सुधारित वेळापत्रकानुसार होतील.

समिती महासंघाच्या कामकाजावर लक्ष ठेवणार
त्यात म्हटले आहे की, “पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या रिट याचिकेच्या निकालानुसार या निवडणुकीचे निकाल घोषित केले जातील.” भारतातील अव्वल कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्या नेतृत्वाखालील महासंघ निलंबित करण्यात आला होता. यानंतर भारतीय वुशू महासंघाचे प्रमुख भूपेंद्र सिंग बाजवा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) द्वारे गठित एक समिती सध्या WFI चे दैनंदिन कामकाज पाहत आहे.

आपल्याच जाळ्यात अडकला बांग्लादेश, न्यूझीलंडने मिळवला थरारक विजय

अव्वल कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले
ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या विरोधात दोन महिन्यांहून अधिक काळ कुस्तीपटूंनी जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. जुलैमध्ये सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया न्यायालयीन खटले दाखल झाल्यामुळे लांबणीवर पडली होती. यानंतर, आंतरराष्ट्रीय महासंघ युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने देखील निर्धारित वेळेत निवडणुका न घेतल्याने WFI ला निलंबित केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube