FIFA World Cup 2026 : रोनाल्डो-मेस्सी ते नेमार-एमबापे; फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडूंची संपत्ती ऐकून व्हाल थक्क!
FIFA World Cup 2026 या खेळातील दिग्गज खेळाडू आणि त्यांच्याकडे असलेल्या बक्कळ मालमत्तेची चर्चा होत असते.
FIFA World Cup 2026: From Ronaldo and Messi to Kylian Mbappé—you’ll be amazed by the legends of the football world : जगातील क्रीडा विश्वातील सर्वात मोठा मानला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल. याच फुटबॉलचा फिफा वर्ल्ड कप जगभरात प्रचंड उत्साहात पाहिला जातो. याच फिफा वर्ल्ड कपचा खेळ सध्या एका रोमांचक टप्प्यावर सुरू आहे. त्यातच अनेकदा या खेळातील दिग्गज खेळाडू आणि त्यांच्याकडे असलेल्या बक्कळ मालमत्तेची चर्चा होत असते. त्यामुळे खेळाडूंकडे नेमके किती संपत्ती आहे आणि ती त्यांना कोणत्या कोणत्या माध्यमातून मिळते पाहूयात.
फुटबॉल या जगप्रसिद्ध खेळातील खेळाडूंमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंची नावे प्रामुख्याने घेतले जातात. जेव्हा त्यांच्या संपत्तीची चर्चा होते. त्यात फक्त खेळातून हा पैसा मिळालेला नसतो. तर त्यांनी केलेल्या अनेक ब्रँडच्या जाहिराती, त्यांचे स्वतःचे बिझनेस, शेअर बाजारातील गुंतवणूक या सर्व गोष्टींमधून त्यांनी त्यांची संपत्ती मिळवलेली आहे. त्यामुळे खेळापासून ते श्रीमंतीच्या जगापर्यंत त्यांनी त्यांच्या असेल स्थान निर्माण केला आहे.
रोनाल्डो-मेस्सीची संपत्ती ऐकून व्हाल थक्क!
पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो हा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे. सौदी अरबच्या अल नस्र या क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोची एकूण संपत्ती 1.2 ते 1.4 बिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये एक खरब रूपयांहून अधिक आहे. ज्यामध्ये त्याला खेळातून मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त नायकी सोबतचे त्याचे लाईफटाईम डील, हॉटेल चेन, जिम, रियल इस्टेट असं त्याचं मोठं आर्थिक साम्राज्य आहे.
त्यानंतर दुसरा नंबर येतो तो अर्जेटीनाला विश्वविजेता बनवणाऱ्या लिओनल मेस्सीचा. इंटर मियाम क्लबकडून खेळणाऱ्या मेस्सीचीच एकूण संपत्ती जवळपास 850 मिलियन डॉलर्स आहे. मिस्सीच्या या प्रचंड संपत्तीचं माध्यम आहे, त्याच्या क्लब कॉन्ट्रॅक्ट्समधी येणारा पैसा, आदिदास सोबतची पार्टनरशिप, हॉटेल्स, रियल इस्टेटमध्ये केलेली मोठी गुंतवणूक.
अरबपती आहेत नेमार अन् एमबापे…
ब्राझीलचा खेळाडू नेमार त्याच्या प्रचंड मोठ्या संपत्तीमुळे नेहमी चर्चेत असतो. सौदीच्या प्रो लीगच्या अल हिलाल क्लबसोबत खेळायला लागल्यानंतर त्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. सध्या त्याच्याकडे 450 ते 500 मिलियन डॉलर दरम्यान संपत्ती आहे. खेळासोबतच तो पूमा, रेड बुल आणि गेमिंग कंपन्यांकडून मोठी कमाई करतो.
त्यानंतर फ्रान्सचा युवा स्टार किलियन एमबापे हा देखील रियल मॅद्रिद क्लबमध्ये सहभागी झाल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या रांगेत गेला आहे. त्याची एकूण संपत्ती 250 ते 700 मिलियन डॉलरच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातं. ज्यामध्ये त्याला क्लबकडून मिळणारी सॅलरी, सायनिंग बोनस तसेच नायकी, हबलो यासारख्या नामांकित कंपन्यांच्या जाहिरातीतून मिळणारा पैसा यांचा समावेश आहे.
या स्टार खेळांडूकडेही प्रचंड संपत्ती…
यानंतर याच यादीमध्ये आणखी काही खेळाडूंची नावं आहेत. ज्यामध्ये मिस्त्रचा मोहम्मद सालाह, इंग्लंडचा हॅरी केन यांच्यासह इतरांची नावं येतात. लिव्हरपूलचा स्टार मोहम्मद सालाहची संपत्ती 140 मिलियन डॉलर आहे. तो आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू मानला जातो. तर बायनर म्यूनिक कडून खेळणाऱ्या हॅरी केनकडे जवळपास 140 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. तर मँचेस्टर सिटीचा केविन डी ब्रुईनकडे 130 मिलियन डॉलर्स आणि याच क्लबचा युवा खेळाडू एर्लिंग हालैंड याची जवळपास 100 मिलियन डॉलर्स संपत्ती आहे.
या शिवाय लॉस एंजिल्स एफसीच्या सोन ह्युंग-मिन याची संपत्ती 100 मिलियन डॉलर आहे. तो आशियाचा सर्वात मोठा स्पोर्ट्स आयकॉन मानला जातो. तर अल नस्रच्या सादियो मानेकडे देखील 100 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. रियल मॅद्रिदचा उगवता स्टार असलेल्या विनीसीएस ज्युनिअरकडे 80 मिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे. याच क्लबचा अनुभवी खेळाडू लुका मोड्रिककडे 75 मिलियन डॉलर्स एवढी संपत्ती आहे.