Football Tournament : नगरमध्ये पंधरा दिवस रंगणार फुटबॉलचा थरार; ‘फिराेदिया शिवाजीयन्स’तर्फे स्पर्धेला प्रारंभ

Football Tournament : नगरमध्ये पंधरा दिवस रंगणार फुटबॉलचा थरार; ‘फिराेदिया शिवाजीयन्स’तर्फे स्पर्धेला प्रारंभ

Football Tournament Ahmednagar: फिरोदिया शिवाजीयन्सच्या (Firodia shivajians) वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 2024 चे (Football Tournament) बुधवार (दि.18 सप्टेंबर) पासून प्रारंभ झाले असून, अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार रंगला आहे. (Ahmednagar News) स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून शालेय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रज्जाक सय्यद, नोएल पारघे, डॉ. दिलीप भालसिंग, डॉ. घुले, सॅव्हिओ वेगास, फुटबॉल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालीद सय्यद, जोगासिंह मीनहास, सचिव रॉनप फर्नांडिस, सहसचिव विक्टर जोसेफ, खजिनदार ऋषपालसिंह परमार, सहखजिनदार रणबिरसिंह परमार, कार्यकारिणी सदस्य राजू पाटोळे, पल्लवी सैंदाणे, जेव्हिअर स्वामी, युनिटी क्लबचे राजेश चौहान, फिरोदिया शिवाजीयन्स कमिटीचे सचिन पाथरे, राजेश अँथनी, जॉय जोसेफ, अभिषेक सोनवणे आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, फुटबॉल वाढविण्यासाठी ग्रासरूटवर काम करणे आवश्‍यक आहे. मैदानावर खेळाडू आणण्यासाठी जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. फुटबॉल प्रशिक्षण व स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. शहरात फुटबॉल हा मुख्य खेळ बनला असून, स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह दिसून येत आहे. खेळाडूंनीही या खेळाकडे करिअर म्हणून पहावे. स्पर्धेत हरणारा एक दिवस सातत्य ठेवून जिंकतो, त्यामुळे पराभवाने निराश न होता प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर या स्पर्धेसाठी दरवर्षी मैदान उपलब्ध करुन देत असल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे आभार मानले.

नरेंद्र फिरोदिया यांची चौथ्यांदा अहमदनगर क्लबच्या सचिवपदी निवड

मनोज वाळवेकर म्हणाले की, फिरोदिया शिवाजीयन्सच्या माध्यमातून फुटबॉल खेळाडू घडविण्याचे काम केले जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. दरवर्षी ही स्पर्धा रंगतदार होत असून, खेळाडूंना आपले कौशल्य दाखवता येते. या स्पर्धेनंतर लवकरच महाराष्ट्र युथ लीग मध्ये राज्यातील 8 नामांकित संघ उतरणार आहे. यामध्ये फिरोदिया शिवाजीयन्स संघाचा देखील समावेश असणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देऊन शहरात फुटबॉल वाढविण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 15 दिवस रंगणार आहे. यामध्ये शहरासह जिल्ह्यातील एकूण 32 शालेय संघानी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून, ही स्पर्धा 12, 14 व 16 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये होणार आहे. तर 17 वर्षा खालील मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube