हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय; सर्व फॉरमॅटमधून ‘कॅप्टनसी’ सोडली

Harmanpreet Kaur : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठा निर्णय घेत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडण्याचा

Harmanpreet Kaur

Harmanpreet Kaur : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठा निर्णय घेत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एका भावूक पोस्टद्वारे ही घोषणा केली. तिच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतेच 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडले असले तरी, तिने खेळांतून निवृत्ती घेतलेली नाही आणि ती एक खेळाडू म्हणून भारतीय संघासाठी खेळणे सुरूच ठेवणार आहे.

हरमनप्रीतच्या (Harmanpreet Kaur) राजीनाम्यानंतर, स्मृती मानधनाकडे (Smriti Mandhana) कर्णधारपद सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. मानधना ने अनेक वर्षे संघाची उपकर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

हरमनप्रीत कौरने इन्स्टाग्रामवर लिहिले, “आज मी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. सर्व प्रकारच्या (फॉर्मेट्सच्या) क्रिकेटसाठी. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. यात अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि अशा काही क्षणांचा समावेश आहे जे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. मी या संघासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटसाठी माझे सर्वस्व अर्पण केले आहे. माझे रक्त, माझा घाम, माझा वेळ आणि अनेकदा माझ्या स्वतःच्या खेळाचा व वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचाही काही भाग. असेही काही प्रसंग आले जेव्हा मला माझी वैयक्तिक कामगिरी, माझी प्रगती आणि माझ्या स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागल्या, कारण माझ्यासाठी ‘संघ सर्वोपरि’ होता. कर्णधार म्हणून मला अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले आहेत.”

लाडक्या बहिणींनो, ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 1500 ; CM फडणवीस आज घेणार मोठा निर्णय

follow us