IND vs AUS : जसप्रित बुमराहने अचानक गाठलं घर; कारणही आलं समोर

IND vs AUS : जसप्रित बुमराहने अचानक गाठलं घर; कारणही आलं समोर

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान दुसरा एकदिवसीय सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज गोलंदाज जसप्रित बुमराहचा (Jasprit Bumrah) समावेश नाही. बुमराह इंदोरला गेलाच नाही तर त्याने थेट आपले घर गाठले. यामागचे कारणही आता समोर आले आहे. बुमराहला आपल्या कुटुंबियांची भेट घ्यायची होती यासाठी संघ व्यवस्थापनाने त्याला छोटा ब्रेक दिला. बुमराह नसल्याने त्याच्या जागी आता मुकेश कुमार (Mukesh Kumar) याला संधी देण्यात आली आहे. पण, प्लेइंग 11 मध्ये ज्या खेळाडूला संधी मिळाला तो आहे प्रसिद्ध कृष्णा.

Asian Games 2023 : चक दे इंडिया! दणादण 16 गोल करत उझबेकिस्तानचा उडवला धुव्वा

बुमराह आता थेट राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या सामन्यात सहभागी होणार आहे. बुमराह बरोबरच या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या हे खेळाडूही परतणार आहेत. त्यामुळे हासामना अटीतटीचा असाच होईल अशी शक्यता दिसत आहे. जसप्रित बुमराह नाही म्हटल्यानंतर त्याच्या जागी मुकेश कुमारला संघात घेण्यात आले. प्रत्यक्षात मात्र प्लेइंग 11 मध्ये प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याचा समावेश केला आहे.

दरम्यान,  ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यापासून वर्ल्डकप स्पर्धा (World Cup 2023) सुरू होणार आहेत. यंदा या स्पर्धा भारतात होणार आहेत. या स्पर्धेआधी होत असेलल्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेकडे दोन्ही संघांच्या तयारीच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. भारत यजमान असणाऱ्या विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून, 19 नोव्हेंबररोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच (Australia) होणार आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ मजबूत दिसत आहे. या स्पर्धेआधी या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना राजकोट येथे होणार आहे. आज इंदोरमध्ये दुसरा सामना होत आहे.  मालिकेतील पहिला सामना जिंकत टीम इंडियाने या मालिकेत आघाडी घेतली आहे.   

Aus vs SA : क्रिकेटचा थरार! ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळ; हरणारा सामना जिंकला

आता रंगणार विश्वचषकाचा थरार

आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, यात संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा, टिळक वर्मा यांना जाहीर करण्यात आलेल्या वर्ल्डकप संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. या तीन खेळाडूंशिवाय युजवेंद्र चहललाही एकदिवसीय विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. भारत यजमान असणाऱ्या विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून, 19 नोव्हेंबररोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियासह अन्य प्रमुख संघांनी यापूर्वीच 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube