Ind vs Aus 3rd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार्दिक पांड्याचा कहर

Ind vs Aus 3rd ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार्दिक पांड्याचा कहर

चेन्नई : भारत (India)आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia)यांच्यातील तीन एकदिवसीय (Three ODIs Series)सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज बुधवारी खेळवला जात आहे. चेन्नईतील (Chennai) चेपॉक मैदानावर तिसरा सामना सुरु आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith)प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नर (David Warner)आणि नॅथन एलिसच्या (Nathan Ellis) जागी अॅश्टन आगर (Ashton Agar)ऑस्ट्रेलियाच्या संघात परतला आहे. कॅमेरून ग्रीनच्या (Cameron Greene)जागी वॉर्नरला संधी मिळाली आहे. तर भारतीय संघ (Indian team)कोणताही बदल न करता मैदानात उतरला आहे.

ऑस्ट्रेलियाला ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. हार्दिक पंड्याने आधी हेडला बाद केले. त्यानंतर स्मिथला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. त्याने मिचेल मार्शलाही गोलंदाजी दिली. हार्दिक पांड्या तिसऱ्या वनडेमध्ये कहर करत आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्शला 47 धावांवर बाद केले आहे.

Gautami Patil : तड तड तड तड.., गौतमी पाटीलच्या भन्नाट डान्सची सर्वांनाच भुरळ

हार्दिक पांड्याने टीम इंडियात पुनरागमन केले आहे. त्याने सलग दोन षटकांत दोन विकेट घेतल्या. स्टीव्ह स्मिथला केएल राहुलने कॅचआऊट केले. तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियन टीम सध्या 122 धावांवर खेळत आहे. आत्तापर्यंत टीम इंडियानं तीन दिग्गज खेळाडूंना माघारी धाडलं आहे.

टीम इंडियाने या मैदानावर यापूर्वी 13 सामने खेळले आहेत. त्यातील टीम इंडियाने 7 सामने जिंकले आहेत तर 5 सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यातील एक सामना अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने चेन्नईच्या मैदानावर आत्तापर्यंत 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यातील 4 जिंकले आहेत. तर एकदाच पराभव स्विकारला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube