INDvsNZ : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी, भारताचा शानदार कमबॅक

  • Written By: Published:
INDvsNZ : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी, भारताचा शानदार कमबॅक

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ ) यांच्यातील तीन कसोटी सामन्यातील दुसरा सामना आजपासून पुण्यातील (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) दमदार कामगिरी करत 59 धावांत 7 विकेट घेतले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा वॉशिंग्टन सुंदरने एका डावात 7 विकेट घेतले आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला होता मात्र आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडचा पहिला डाव 259 धावांवर आटोपला.  कर्णधार लॅथम, विल यांग आणि कॉनवेला अश्विनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडकडून कॉनवेने 76 आणि रचिन रवींद्रने 65 धावा केल्या मात्र त्यानंतर एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर राहू शकला नाही.

तर दुसरीकडे भारतीय संघाची पहिल्या डावाची सुरुवात देखील खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितला टीम साऊदीने क्लीन बोल्ड केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात 16 धाव केल्या आहे. सध्या भारताकडून शुभमन गिल 10 धावांवर आणि यशस्वी जयस्वाल 6 धावांवर नाबाद आहे.

‘नौटंकी करणाऱ्यांना साथ देऊ नका, लढाई संविधान वाचवण्याची’, यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल

या सामन्यात न्यूझीलंडची धावसंख्या 3 बाद 197 अशी होती आणि न्यूझीलंड सहज 300 चा टप्पा पार करणार असं वाटत होते मात्र त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने दमदार कामगिरी करत 7 विकेट घेतले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 11 विकेट पडल्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारताने एक विकेट गमावून 16 धावा केल्या आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 8 विकेटने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पिछाडीवर आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube