IND vs NZ 3rd Test: मुंबई कसोटी, भारताची गोलंदाजी, ‘हा’ स्टार खेळाडू संघातून बाहेर

  • Written By: Published:
IND vs NZ 3rd Test: मुंबई कसोटी, भारताची गोलंदाजी, ‘हा’ स्टार खेळाडू संघातून बाहेर

IND vs NZ 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा आजपासून तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु झाला आहे. या सामन्यात टॉस जिंकून किवी कर्णधार टॉम लॅथमने (Tom Latham) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाला या मालिकेत क्लीन स्वीप टाळण्यासाठी हा सामना जिंकायचा आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jaspreet Bumrah) आराम दिलं आहे तर त्याच्या जागी मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) संघात स्थान देण्यात आले आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडने देखील या सामन्यात दोन बदल केले आहे. त्यांनी इश सोधीला संघात संधी दिली आहे.  तर मिचेल सँटनर आणि टीम साऊथी या सामन्यात खेळणार नाही.

टॉस जिंकल्यानंतर मोठी धावसंख्या उभारून टीम इंडियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे टॉम लॅथमने म्हटले आहे तर भारतालाही प्रथम फलंदाजी करायची होती असं रोहित शर्मा म्हणाला. डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारतासाठी हा कसोटी सामना खूप महत्वाचा आहे.  डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला आता 6 पैकी 4 कसोटी सामने जिंकणे आवश्यक आहे. नाहीतर इतर संघाच्या निकालावर भारतीय संघाला अवलंबून राहावे लागणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने बेंगळुरू आणि पुणे कसोटीमध्ये खराब प्रदर्शन केल्याने भारताला न्यूझीलंड विरुद्धची ही मालिका गमवावी लागली आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन:

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

OnePlus 13 अखेर लाँच, पॉवरफुल प्रोसेसर अन् भन्नाट फीचर्स, किंमत आहे फक्त …

न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन:

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्के.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube