IND vs SA : दुसऱ्या सामन्याआधीच टेन्शन! ‘या’ कारणामुळे सामना रद्द होण्याची शक्यता

IND vs SA  : दुसऱ्या सामन्याआधीच टेन्शन! ‘या’ कारणामुळे सामना रद्द होण्याची शक्यता

IND vs SA 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर आज दुसरा टी 20 सामना होणार आहे. मात्र, हा सामनाही पावसामुळे रद्द करावा लागण्याची दाट शक्यता असल्याने याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता हा सामना होणार होता पण आता हा सामना 8.30 वाजता होणार आहे. त्यामुळे हा सामना रात्री 12 किंवा 1 वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच या सामन्यात पावसाच्या व्यत्ययाची दाट शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज पाऊस पडण्याची शक्यता 80 टक्के आहे. त्यामुळे सामना रद्द होण्याचीही शक्यता आहे. असे झाले तर क्रिकेटचाहत्यांचा मोठा  हिरमोड होईल.

दुसऱ्या T20 मध्येही खेळणार नाही दीपक चहर! हे आहे कारण

पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. सध्या दक्षिण आफ्रिकेत पावसाळा सुरू आहे. येथे रोजच जोरदार पाऊस होत आहे. आजही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसरा टी 20 सामना ज्या शहरात होणार आहे तेथेही पावसाची 80 टक्के शक्यता आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी पाऊस होईल, त्यामुळे हा सामनाही रद्द करावा लागेल. त्यात आता या सामन्याची वेळही बदलण्यात आली आहे. आधी हा सामना 7.30 वाजता होणार होता तो आता 8.30 वाजता सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8.30 वाजता सुरू होणार होता. मात्र, बीसीसीआयच्या वेबसाइटमुळे गोंधळ उडाला. वेबसाइटवर सामन्याची वेळही फक्त संध्याकाळी 7.30 वाजता देण्यात आली होती. मात्र, आता दुसरा आणि तिसरा सामना 8.30 वाजता होईल अशी माहिती मिळाली आहे. सामना सुरू झाला तरी देखील पावसाची जास्त शक्यता आहे. त्यामुळे हा सामना होईल की नाही, हाच मोठा प्रश्न आहे.

IND vs SA : आज टीम इंडिया आफ्रिकेला भिडणार; जाणून घ्या, पिच रिपोर्ट अन् रेकॉर्ड्स

भारताचा संभाव्य संघ 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, सिराज.

आफ्रिकेचा संघ 

एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हँड्रिक्स, मॅथ्यू ब्रिट्झके/ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फेरेरा, मार्को यान्सन/अँडाइल फेलुकॉय, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, तबरेज शम्सी.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube