IND vs AUS : अटीतटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून दणदणीत विजय

  • Written By: Published:
IND vs AUS : अटीतटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून दणदणीत विजय

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना आज मुंबई येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचाने भारतासमोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान पाच विकेटच्या मोबदल्यात 39 षटकात पूर्णकरत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. भारताकडून के एल राहुल ने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. त्याला जडेजाने चांगली साथ देत 45 धावा काढल्या. या विजयासह भारताने मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 189 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. परंतु भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक राहिली दुसऱ्याच षटकात स्टोइनिसने भारताला पहिला धक्का दिला. युवा फलंदाज ईशान किशन अवघ्या तीन धावा करून बाद झाला. त्यानंतर फॉममध्ये असलेला विराट कोहली ही काही खास करू शकला नाही तो देखील 4 धावा करून बाद झाला. नंतर आलेला सूर्यकुमार यादव देखील पहिल्याच चेंडूवर बाद झाला. भारताने अवघ्या 16 धावात 3 विकेट गमावल्या.

परंतु सलामीला आलेला शूबमन गिल दुसऱ्या बाजूने टिकून होता. पाचव्या क्रमांकावर आलेला के एल राहुल चांगल्या धावा करून लागला. परंतु 39 धावावरती भारतने 4 विकेट गमावली गिल 20 धावा करून बाद झाला. नंतर आलेला कर्णधार हार्दिक पांड्या आणि राहुलने संयमी खेळी करून संघाची धावसंख्या 100 च्या जवळ पोहचवली परंतु पांड्या देखील 25 करून बाद झाला. यावेळी अवघ्या 83 धावात अर्धा संघ तंबूत परतला होता. परंतु नंतर आलेल्या जडेजाने राहुल सोबत संयमी खेळीकरत गेलेला सामना परत आणत भारताला विजय मिळून दिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क ने 3 तर स्टोइनिसने 2 गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाकडून सलामीचा फलंदाज मिचेल मार्श याने सर्वाधिक 81 धावा केल्या. तर भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या या व्यतिरिक्त रवींद्र जाडेजाने 2 विकेट तर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याने 1 विकेट घेतली फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube