बांगलादेशचे भारतासमोर 145 धावांचे आव्हान, भारताची खराब सुरूवात

बांगलादेशचे भारतासमोर 145 धावांचे आव्हान, भारताची खराब सुरूवात

नवी दिल्ली : दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांत आटोपल्याने भारतासमोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान आहे. मात्र अखेरच्या डावात भारताची सुरूवात अत्यंत खराब सुरूवात झाली. अवघ्या 19 धावांत भारताने सलामीची जोडी गमावली.

दुसऱ्या डावात भारताकडून अक्षर पटेल सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 3 बळी टिपले. मोहम्मद सिराज आणि अश्विनने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर उमेश यादवला 1 बळी घेता आला.

त्यापूर्वी बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. तर भारताने 314 धावा करत 80 धावांची जेमतेम आघाडी मिळवली. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरच्या झुंजार अर्धशतकामुळे भारताला आघाडी मिळवता आली.

दुसऱ्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशची सुरूवात खराब झाली. झाकिर हुसनने 51 तर लिंटन दासने 73 धावा केल्या. डावाच्या शेवटी लिंटन दास आणि टस्किन अहमदने 50 धावांची महत्वपूर्ण भागिदारी केल्याने बांगलादेशला भारतासमोर 144 धावांचे आव्हान देता आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube