भारत श्रीलंकेत आज अंतिम सामना

भारत श्रीलंकेत आज अंतिम सामना

मुंबई : भारतीय संघ आज यजमान श्रीलंका यांच्याविरुद्ध तिसरा व अंतिम सामना आज खेळणार आहे. विशेष बाब म्हणजे तीन सामन्याच्या या मालिकेत भारत 2-0 ने आघाडीवर आहे. तसेच आजचा अंतिम सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे. तर विजय मिळवून भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न श्रीलंकेचा असेल.

तिसरा वनडे रविवारी तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाईल. अशा स्थितीत टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये 4 बदल होऊ शकतात. सूर्यकुमार यादव, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळू शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात ओपनिंगमध्ये बदल होऊ शकतो.

शुभमन गिलच्या जागी इशान किशनला संधी दिली जाऊ शकते. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात किशनने द्विशतक झळकावले होते. गिलला पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली होती, त्याला तिसऱ्या सामन्यात खेळवले जाऊ शकते. त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवला खेळवले जाऊ शकते. श्रेयस अय्यरला पहिल्या दोन वनडेत चांगल्या धावा करता आल्या नाहीत.

याशिवाय अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला रिप्लेस केले जाऊ शकते. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षरने प्रभावी कामगिरी केली आहे. दुसरीकडे, सुंदरनेही त्याला मिळालेल्या प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीत एक बदल होऊ शकतो. मोहम्मद शमीच्या जागी अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते.

संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल/इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव/श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी/अर्शदीप सिंग, उमरान मलिक, मोहम्मद सिराज.

वेळ : दुपारी 01.30 वाजता
ठिकाण : ग्रीनफिल्ड स्टेडियम, तिरुअनंतपुरम
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube