भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना आज रंगणार
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरीकडे यजमान संघ देखील विजयासाठी मैदानात उतरणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत तब्बल 163 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतानं 94 सामने जिंकले असून श्रीलंका संघाला 57 सामने जिंकण्यात यश आलं आहे. याशिवाय दोघांमधील एकूण 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसंच एक सामना बरोबरीत सुटला आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात सर्वात आधी नाणफेक जिंकत श्रीलंका संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ आधी फलंदाजीला आला. आधी फलंदाजी करत भारताने 374 धावांचे लक्ष्य श्रीलंका संघासमोर ठेवले. पण 50 षटकांत श्रीलंकेचा संघ 8 गडी गमावून 306 धावाच करु शकला ज्यामुळे भारत 67 धावांनी विजयी झाला आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.
श्रीलंका संघ : दसुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन आणि लाहिरु कुमारा.