IPL 2023: टुक-टूक बॅट्समन बनला सिक्सर किंग, अजिंक्यने सांगितला किस्सा…

  • Written By: Published:
IPL 2023: टुक-टूक बॅट्समन बनला सिक्सर किंग, अजिंक्यने सांगितला किस्सा…

T20 क्रिकेटमधील अजिंक्य रहाणेचा स्ट्राइक रेट 120.50 आहे. बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या अजिंक्यने नुकतेच सांगितले होते की, मी हार मानली नाही. तेव्हापासून त्याची बॅट खूप बोलते आहे. या आयपीएलमध्ये तो पूर्णपणे नव्या अवतारात दिसत आहे. गेल्या तीन हंगामात कधीही 105 च्या वर स्ट्राईक रेट न खेळलेल्या अजिंक्य यावेळी वेगळ्याचपद्धतीने फलंदाजी करत आहे. यावेळी त्याने पाच सामन्यांत 199.05 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

रहाणेने काल चेन्नई विरुद्ध केकेआरमध्ये झालेल्या सामन्यात. त्याचा स्ट्राइक रेट 244.82 वर पोहोचला. चेन्नईकडून खेळताना अजिंक्यने 29 चेंडूत नाबाद 71* धावा केल्या. यामुळे ईडन गार्डन्सवर सीएसकेने सर्वात मोठी टी-20 धावसंख्या म्हणजे चार गडी गमावून 235 धावा केल्या. आयपीएलच्या चालू हंगामातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. रहाणेने या खेळीदरम्यान मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारले. त्याने 2016 नंतर आयपीएलमधील पहिलाच सामनावीराचा पुरस्कार मिळवला.

मोहम्मद सिराजने रागाच्या भरात केली शिवीगाळ, ‘त्यानंतर घडले असे कृत्य की…’

जुना रहाणे आणि आताचा रहाणे यात जमीन-आसमानाचा फरक आहे. या आयपीएलमध्ये तो प्रत्येक 9 चेंडूंनंतर सरासरी एक षटकार मारत आहे. रहाणेचा मागील सर्वोत्तम विक्रम 2019 मध्ये 31 चेंडू प्रति षटकार मारत होता. रहाणे हा बरोबरी करणारा खेळाडू आहे. षटकार मारण्यासाठी त्याने आपला खेळ बदलला नाही तर केवळ आपली ताकद वाढवली आहे. असे त्यांने सांगितले आहे. अजिंक्य नेहमीच वेगवान गोलंदाजीविरुद्ध चांगला खेळला आहे, पण यंदा त्याचा स्ट्राइक रेट 254.16 आहे.

चेन्नई विरुद्ध केकेआरमध्ये झालेल्या सामन्यात ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. या सामन्यात अजिंक्यने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार मारले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube