Khaleel Ahmed : IPL 2027 लिलावापूर्वी CSK आणि SRH मध्ये ट्रेड ; 4 खेळाडूंची अदलाबदल

Khaleel Ahmed : आयपीएल 2027 साठी बीसीसीआयकडून जोरदार तयार सुरु करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांमध्ये आयपीएल 2027 साठी

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Khaleel Ahmed

Khaleel Ahmed : आयपीएल 2027 साठी बीसीसीआयकडून जोरदार तयार सुरु करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांमध्ये आयपीएल 2027 साठी मिनी लिलाव देखील होणार आहे मात्र यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मोठा ट्रेड झाला आहे. या ट्रेडमध्ये चेन्नईचे दोन स्टार गोलंदाज हैदराबादला गेले आहे तर हैदराबादमधून दोन खेळाडू चेन्नईसाठी आता खेळताना दिसणार आहे. या ट्रेडमध्ये एक भारतीय खेळाडू आणि तीन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार, सनरायझर्स हैदराबादने (SRH) इंग्लंडचे अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) आणि जॅक एडवर्ड्स (Jack Edwards) यांना चेन्नई सुपर किंग्जला (CSK) डील केले आहे, तर सीएसकेने खलील अहमद (Khaleel Ahmed) आणि नॅथन एलिस (Nathan Ellis) यांना एसआरएचला डील केले आहे. लिव्हिंगस्टोनने सीएसकेला 6 कोटी रुपयांना ट्रेड केले आहे. तर या बदल्यात चेन्नईने खलीलला 4.8 कोटी रुपये आणि नॅथन एलिसला 2 कोटी रुपयांमध्ये ट्रेड केले आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदेंची बिनविरोध निवड-

लिव्हिंगस्टोनची किंमत निम्म्याहून अधिक कमी

चेन्नई सुपर किंग्सने लियाम लिव्हिंगस्टोनला फक्त 6 कोटी रुपये दिले आहे. तर लिलावादरम्यान हैदराबादने लिव्हिंगस्टोनला 13 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तर गेल्या हंगामात जॅक एडवर्ड्सला जेवढी रक्कम मिळाली होती तेवढीच रक्कम या हंगामात मिळणार आहे. त्याला चेन्नईकडून 3 कोटी रुपये मिळणार आहेत. सनरायझर्स हैदराबादकडून खलील अहमद यापूर्वी 2018 ते 2021 या कालावधीत खेळला आहे. 2025 मध्ये खलीलने चेन्नईसाठी शानदार कामगिरी केली होती मात्र तरीही देखील त्याला ट्रेड करण्यात आल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

follow us