संजू सॅमसन चेन्नईत तर शार्दुल खेळणार मुंबईकडून; जाणून घ्या IPL 2026 साठी टॉप 5 ट्रेड
IPL 2026 Trade : इंडियन प्रीमियर लीग 2026 साठी सर्व संघानी त्यांच्या रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2026 चेन्नईसह
IPL 2026 Trade : इंडियन प्रीमियर लीग 2026 साठी सर्व संघानी त्यांच्या रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2026 चेन्नईसह केकेआरने मोठे निर्णय घेत अनेकांना धक्का दिला आहे. त्यामुळे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होणाऱ्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या हंगामासाठी झालेल्या काही प्रमुख ट्रेडबद्दल जाणून घ्या.
चेन्नईचा मोठा डाव, संजूचा आरआरला रामराम
भारतीय संघाचा स्टार फलंदाज संजु सॅमसन (Sanju Samson) आता चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये चेन्नईसाठी संजू पहिल्यादांच खेळणार आहे. चेन्नई संजूला 18 कोटी रुपये देणार आहे. 2026 आयपीएलसाठी संजू सॅमसन चेन्नईचा कर्णधार देखील असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रवींद्र जडेजा आरआरकडून खेळणार
तर दुसरीकडे चेन्नईचा माजी कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) पुन्हा एकदा राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे. जडेजा 2008 मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकणाऱ्या राजस्थान संघाचा भाग होता. यानंतर जडेजाने चेन्नईसाठी अनेक सामन्यात महत्वाची भूमिका बजावली. राजस्थानने संजू सॅमसनच्या जागी सॅम करन आणि जडेजाला चेन्नईकडून ट्रेड केले आहे. राजस्थान जडेजाला 14 कोटी रुपये देईल तर 4 कोटी रुपये सॅम करनला मिळणार आहे.
मोहम्मद शमी
भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले होते मात्र आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. लखनऊ सुपरजायंट्सने त्याला सनरायझर्स हैदराबादकडून ट्रेड केले आहे. हैदराबादने शमीसाठी लखनऊच्या कोणत्याही खेळाडूला ट्रेड केले नाही. शमीला लखनऊकडून 10 कोटी रुपये मिळणार आहेत.
शार्दुल ठाकूर मुंबईत दिसणार
तर दुसरीकडे लखनऊ सुपरजायंट्सने आणखी एक मोठा ट्रेंड करत शार्दुल ठाकूरला ट्रेंड करत मुंबईकडून अर्जुन तेंडुलकरला संघात घेतले आहे. शार्दुल आता मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. लखनऊ सुपरजायंट्स अर्जुन तेंडुलकरसाठी मुंबईला 30 लाख रुपये देणार आहे. तर शार्दुल ठाकूरसाठी मुंबई 2 कोटी रुपये लखनऊ सुपरजायंट्स देणार आहे.
16 विकेट आणि 245 धावा; दुसऱ्या दिवशी भारताचं कमबॅक अन् दक्षिण आफ्रिका ‘बॅकफूट’ वर
नितीश राणा दिल्लीसाठी खेळणार
नितीश राणा आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. गेल्या हंगामात नितीश राणा राजस्थानकडून खेळला होता. दिल्ली आणि राजस्थानने 4.2 कोटीमध्ये नितीश राणासाठी ट्रेंड केला आहे.
