Kabaddi : महाराष्ट्र कब्बडी संघाची यजमान ओडिशावर मात करत उपांत्यपूर्व फेरीत धडक

National Kabaddi Championship : महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ७१व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. कटक, ओडिशा येथील जे. एन. बंदिस्त क्रीडा संकुलात मॅटवर झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने यजमान ओडिशाचे आव्हान ४३-२६ असे सहज संपुष्टात आणले. आता गाठ पंजाब संघाशी पडेल.
आज भारत-पाकिस्तान दुबईत येणार आमने-सामने; आजारी ऋषभ पंतच्या जागेवर कोण खेळणार?
सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना महाराष्ट्राने ओडिशावर तिसरा लोण देत आपली आघाडी ४१-२१ अशी वाढविली. शेवटी १७ गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. अजित चौहानला चढाईत आकाश शिंदेची, तर पकडीत संकेत सावंत, मयूर कदमची उत्कृष्ट साथ लाभली. रात्री उशिरा झालेल्या क गटातील शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने त्रिपुराचा प्रतिकार ४६-३६ असा मोडून काढत या गटात अव्वल स्थान मिळविले.