आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद विजयानंतर क्रीडामंत्र्यांकडून गौरव, किती लाखांचं मिळालं बक्षीस?

आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद विजयानंतर क्रीडामंत्र्यांकडून गौरव, किती लाखांचं मिळालं बक्षीस?

Indian womens kabaddi Championship : जागतिक महिला दिनी भारताच्या संघाने आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. मराठमोळ्या सोनाली शिंगटेच्या नेतृत्वात भारताने पाचव्यांदा स्पर्धेतो जेतेपद मिळवले. (kabaddi ) अंतिम सामन्यात भारतीय संघाने यजमान इराणवर ३२-२५ अशा फरकाने मात केली व स्पर्धा जिंकत विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव कोरले.

या विजयानंतर भारतीय महिला कबड्डी संघाला मंगळवारी गौरवण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. महिला कबड्डी संघ भारतात परतला. पाचव्यांदा विजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघाचा क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी त्यांचा सत्कार केला. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला ६७ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना संपन्न; दुबईला मिळाला कोट्यवधी रुपयांचा महसूल

याप्रसंगी बोलताना, माननीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले, ‘आम्ही आमच्या महिला खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. पुरुषांच्या लीगच्या अनुषंगाने, आम्ही महिलांना अधिक संधी देण्यासाठी महिला कबड्डी लीग सुरू करणार आहोत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमच्या मुलींना विकसित भारताच्या विकासात समान संधी मिळाव्यात अशी इच्छा आहे.

“हैदराबादमधील चिंतन शिबिरात, आम्ही कॉर्पोरेट क्षेत्राला खेळ स्वीकारण्यास भाग पाडण्याचा आणि सर्वोत्तम आर्थिक सहाय्य तसेच खेळाडूंना चांगले प्रशिक्षक मिळतील आणि चांगले प्रशिक्षण देतील अशा अकादमी उघडण्याचा निर्णय घेतला. कबड्डीसह स्थानिक खेळांसाठीही आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करू, ते पुढे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube