हर्षवर्धन सदगीर डब्बल महाराष्ट्र केसरी ! नाशिकच्या पठ्ठ्याने पटकाविली मानाची गदा
Mahrashtra Kesari 2026-तीन गुण घेत चार गुणांनी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल करत विजय मिळविला. हे दोन्ही पहिलवान एकाच आखाडातील आहेत.
Mahrashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरमध्ये (Harshwardhan Sadgir) लढत झाली. यात हर्षवर्धन सदगीरने विजय मिळवला. तो डब्बल महाराष्ट्र केसरी ठरला आहे. विशेष म्हणजे दोन्ही मल्ल एकाच आखाड्यातील असून, त्यांचे वस्तादही एकच आहेत. तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहास डब्बल महाराष्ट्र केसरी ठरणारा हर्षवर्धन सदगीर हा सातवा मल्ल आहे.
फायनलचा थरार रंगला
लढतीच्या सुरुवातीला बाहुबली महेंद्र गायकवाडने एक गुण घेतला. त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने एक गुण घेतला. त्यामुळे पहिल्या फेरीत दोघांचे समान गुण झाले. दुसऱ्या फेरीत महेंद्र गायकवाड आक्रमक झाला. पण हर्षवर्धनने संयमी खेळत डाव उलटून लावला. त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने तीन गुण घेत चार गुणांनी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल करत विजय मिळविला. हे दोन्ही पहिलवान एकाच आखाडातील आहेत.
अभिनंदन, 'डबल महाराष्ट्र केसरी' हर्षवर्धन सदगीर !
६८व्या 'महाराष्ट्र केसरी'वर नाव कोरल्याबद्दल पैलवान हर्षवर्धन सदगीर याचे मनःपूर्वक अभिनंदन !
दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकत 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमानही हर्षवर्धनने मिळवला असून त्याबद्दल त्याचे विशेष… pic.twitter.com/S2LbH6rJic
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 22, 2026
माती व गादी विभागाच्या फायनल अशा झाल्या ?
माती विभागातील अंतिम लढत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीच्या सिंकदर शेख यांच्यात झाली. महेंद्र गायकवाडने सुरुवातीला दोन गुण घेतले. त्यानंतर महेंद्रने एक गुण घेत पहिल्या फेरीत तीन गुणाची आघाडी घेतलीय. दुसऱ्या फेरीत सिंकदरने पट काढण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे बाहुबली महेंद्र गायकवाडने 3-० ने आघाडी घेतली आणि विजेतपद पटकाविले आहे. गादी विभागाच्या अंतिम फेरीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या जयदीप पाटीलचा सहज पराभव केला. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीरमध्ये महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी गादीवर लढत झाली. सदगीरने 2020 ची 63 वी महाराष्ट्र केसरी जिंकलेली आहे. ही स्पर्धा ही पुण्यात झालेली आहे.
68 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यातील वाघोली येथे झाली. आयोजक रामकृष्ण अण्णा सातव-पाटील यांनी यंदा सर्वात मोठे बक्षीसे ठेवली होती. विजेता हर्षवर्धनला फॉर्च्युनर, पाच लाख रुपये आणि मानाची गदा देण्यात आली आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाडला स्कॉर्पिओ आणि चार लाख रुपये रक्कम बक्षीस देण्यात आले. इतर विजेत्यांना 18 बुलेट आणि 18 स्प्लेंडर असे बक्षीसे दिली.