MI vs PBKS: सूर्या-इशानचं तुफान फलंदाजी, सलग दोन सामने जिकंत मुंबईने रचला इतिहास…

MI vs PBKS: सूर्या-इशानचं तुफान फलंदाजी, सलग दोन सामने जिकंत मुंबईने रचला इतिहास…

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) ने इतिहास रचला आहे. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात 200 किंवा त्याहून अधिक धावसंख्येचा पाठलाग केला आहे. अशी कामगिरी करणारा मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. सूर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या तुफान फटकेबाजीमुळे त्याने हा पराक्रम केला आहे.

मुंबई इंडियन्सने 30 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यानंतर, संघ बुधवारी (3 मे) पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध पुढील सामना खेळला.

पंजाबच्या संघाविरुद्ध 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत मुंबई इंडियन्सने इतिहास रचला आहे. यासह मुंबईने आयपीएलच्या इतिहासातील चौथ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला आहे. 2020 च्या मोसमात शारजाहमध्ये पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्सने स्पर्धेतील 224 धावांच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता.

लिव्हिंगस्टोनने पंजाबसाठी धडाकेबाज खेळी खेळली

बुधवारी मोहालीत खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने पंजाबचा 6 गडी राखून पराभव केला. जलद अर्धशतक ठोकणारे सूर्यकुमार आणि ईशान हे सामन्याचे नायक ठरले. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 3 गडी गमावून 214 धावा केल्या. पंजाबसंघासाठी लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी तुफानी खेळी खेळताना चौथ्या विकेटसाठी 53 चेंडूत 119 धावांची नाबाद भागीदारी केली.

लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत नाबाद 82 धावांची सर्वोच्च खेळी केली. तर जितेशने 27 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने 4 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट 195.23 होता. दुसरीकडे, जितेशने 2 षटकार आणि 5 चौकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 181.48 होता. मुंबईकडून पियुष चावलाने सर्वाधिक 2 बळी घेतले.

wrestlers Protest : हा दिवस पाहण्यासाठी आम्ही पदकं मिळवली का? कुस्तीपटुंचा केंद्र सरकारला सवाल

सूर्या आणि ईशानने अशा प्रकारे संपूर्ण सामना फिरवला

215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर संघाने खाते न उघडता कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली होती. मात्र येथून कॅमेरून ग्रीन आणि इशान किशन यांनी डाव सांभाळला. 54 धावांवर दुसरा धक्का, ग्रीन बाद होताच सूर्याने जबाबदारी स्वीकारली.

ईशानने 41 चेंडूत 75 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. तर सूर्यकुमारने 31 चेंडूत 66 धावा केल्या. या दोघांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने 4 गडी गमावून 216 धावा केल्या आणि सामना जिंकला. पंजाबकडून नॅथन एलिसने 2 बळी घेतले. इशानची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube