Sachin Tendulkar : वनडे मालिका बोरिंग होत चालल्यात; सचिनने सांगितली भन्नाट आयडिया

Sachin Tendulkar : वनडे मालिका बोरिंग होत चालल्यात; सचिनने सांगितली भन्नाट आयडिया

Sachin Tendulkar On OndDay Cricket :  भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने एकदिवसीय क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी एक उपाय सुचवला आहे. सचिनने एकदिवसीय सामना खेळण्यासाठी एक नवीन फॉरमॅट सांगितला आहे. यावर्षी भारतात एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्डकप होणार आहे. हा एकदिवसीय क्रिकेटचा अखेरचा वर्ल्डकप असू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. याचे कारण गेल्या काही काळापासून एकदिवसीय क्रिकेट पाहणारे लोक कमी झाल्याचे बोलले जात आहे.

सचिन तेंडूलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी नाविन्यता येण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांनी ते पाहण्यासाठी एक नवीन कल्पना सांगितली आहे. एकदिवसीय क्रिकटेला कसोटी क्रिकेटसारखे चार भागांमध्ये विभागून द्यावे, असे तो म्हणाला आहे. एकदिवसीय क्रिकेटचे 25-25 ओव्हरचे चार भाग करावेत, ज्यामध्ये विकेट या 20 च्या ऐवजी दहाच असतील, असे सचिन म्हणाला आहे. यावेळी तो इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलत होता.

Imran Khan : मोठी दुर्घटना टळली! ताफ्यातील गाड्यांचा अपघात; इम्रान खान थोडक्यात बचावले

सध्या 50 ओव्हर्सच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही इनिंगसाठी नवा बॉल दिला जातो. पण यामुळे रिवर्स स्विंग पुर्णपणे संपूष्टात आली आहे. त्यामुळे सामन्याची 40वी ओव्हर जरी चालू असली तरी ती त्या बॉलची 20वी ओव्हर सुरु असते.

सचिन पुढे म्हणाला की, एकदिवसीय क्रिकेटला कसोटी सामन्यांसारखे चार भागात विभाजित केले पाहिजे. टेस्ट मध्ये आपल्याकडे 20 विकेट असतात पण इथे मात्र 10 विकेटच असतील. जर तु्म्ही 25 ओव्हरमध्येच ऑलआऊट झालात तर तुम्ही बाकी 25 ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी येऊ शकत नाही.

पाच भाषांमध्ये गाणं गाणाऱ्या ‘त्या’ अवलियाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

दरम्यान, सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50-50 ओव्हर्सची एक इनिंग असून प्रत्येक टीमकडे 10 विकेट आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हा फॉरमॅट खेळवला जात आहे. जेव्हापासून टी-20 क्रिकेट आले आहे तेव्हापासून ते देशभरात फेमस झाले आहे. तेव्हापासून लोक एकदिवसीय क्रिकेटला कंटाळले आहेत. त्यामुळे या खेळात बदल करण्याची चर्चा होते आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube