यजमान पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; कशी आहे प्लेईंग इलेव्हन?

PAK vs NZ Champions Trophy 2025 : यजमान पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा रंगणार आहे. आज पाकिस्तान व न्यूझीलंड संघात लढत होणार आहे. ८ वर्षांनंतर होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्याचा (Trophy ) नाणेफेक पाकिस्तानने जिंकला असून कराची मैदानावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आता घरच्या मैदानावर पाकिस्तान संघ विजयी सुरूवात करणार की तिरंगी मालिकेत भारी पडलले ब्लॅक कॅप्स पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभावाची धूळ चारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.
Champions Trophy 2025 भारताच्या अडचणी वाढणार? न्यूझीलंडच्या संघात या स्टार खेळाडूची एंट्री
पाकिस्तानला स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. कारण त्यांचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरूद्ध असणार आहे आणि त्यानंतर पाकिस्तान बांगलादेशविरूद्ध भिडणार आहे. भारतीय संघ इंग्लंडला व्हाईटवॉश करून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उतरला आहे. तर तिरंगी मालिकेत न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत करत मालिका जिंकली. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत उपांत्यपूर्व फेरी गाठणे पाकिस्तानसाठी फारच आव्हानत्मक असणार आहे.
पाकिस्तानी संघाची गोलंदाजीची मदार शाहीन शाह आफ्रिदी याच्यावर असणार आहे. तिरंगी मालिकेत त्याने पाकिस्तानकडून सर्वाधिक फलंदाज बाद केले होते, पण त्याला धावांवर अंकुश ठेवता आला नाही. अबरार अहमद, हॅरीस रौफ, नसीम शाह व मोहम्मद हसनेन यांनाही गेल्या काही लढतींमध्ये प्रभाव टाकता आलेला नाही.
तर आजच्या सामन्यात बॅक कॅप्सचा अष्टपैलू डॅरी मिचेल उल्लेखनिय कामगिरी करू शकतो. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत न्यूझीलंडचा डॅरी मिचेलने दोन अर्धशतके ठोकली. डॅरी मिचेलला आशियाई परिस्थितीचा चांगला अंदाज आहे. पाकिस्तानमध्ये त्याने ५१ च्या सरासरीने एकूण ५१७ धावा केल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आज डॅरी मिचेल चमकू शकतो.
पाकिस्तान संघ
फकर झमान, बाबर आझम, साऊद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार, विकेटकीपर), सलमान अली अघा, तायब ताहीर, खुशदील शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अब्रार अहमद
न्यूझीलंड संघ
विल यंग, डेव्हॉन कॉन्वे, केन विल्यमसन, डॅरी मिचेल, टॉम लॅथम(विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल ब्रेसवेल, मिचेल सॅंटनर (कर्णधार), नेथन स्मिथ, जेकब डफी, विल ओ’रुर्क