पहिल्याच सामन्यात पाकिस्तान OUT? सामना गमावला तर धोका वाढणार, गणित काय..

Champions Trophy 2025 : आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेची सुरुवात (Champions Trophy 2025) आजपासून पाकिस्तानात होणार आहे. पहिलाच सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. उद्या टीम इंडिया पहिल्या सामन्यात बांग्लादेशला टक्कर देणार आहे. सन 2017 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान विजेता ठरला होता. परंतु, यंदा त्यांच्यासाठी आव्हान सोपं नाही. जर एकही सामना गमावला तरी पाकिस्तान थेट स्पर्धेतूनच बाद होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल साखळी फेरीत तीन सामने आहेत मग एक सामना गमावला तर संघ बाहेर कसा होईल? पाकिस्तान या सामन्यात पराभूत झाला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
या स्पर्धेचा पहिलाच सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या सामन्यात जर पाकिस्तानचा पराभव झाला तर स्पर्धेतून बाद होण्याचा धोका आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ आहेत. एका गटात चार टीम आहेत. अशा परिस्थितीत जर पहिला सामना गमावला तर पुढील सामने करो या मरो असे असतील. कोणत्याही संघाला उपांत्य फेरी गाठायची असेल तर तीन पैकी दोन सामने जिंकणे गरजेचे आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियाची नवी जर्सी; ‘पाकिस्तान’चे नाव; पाहा संपूर्ण खेळाडूंचे फोटो
पाकिस्तानने जर पहिला सामना गमावला तर पुढील दोन सामने बांग्लादेश आणि भारताविरुद्ध आहेत. हे दोन्ही सामने नुसते जिंकून उपयोग नाही तर चांगल्या रनरेटने जिंकावे लागतील. परंतु, असे होण्याची शक्यता फार कमी आहे. बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान कदाचित जिंकेल. परंतु, भारताविरुद्धची लढत सोपी नाही. आयसीसीच्या स्पर्धांचा इतिहास पाहिली तर भारतीय संघ नेहमीच पाकिस्तानला भारी ठरला आहे. या सामन्यात चांगला रनरेट ठेवणे आणि जिंकणे पाकिस्तानसाठी प्रचंड अवघड राहणार आहे.
पहिल्या सामन्यातच होणार THE END
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. विशेष म्हणजे या मालिकेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोनदा आमनेसामने आले. या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला. इतकेच नाही तर या तिरंगी मालिकेत अखेरचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर झाला. या स्टेडियमची परिस्थिती किवी संघाला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचा या मैदानातील पहिलाच सामना पाकिस्तानसाठी कठीण ठरणार आहे.
Champions Trophy 2025 मध्ये बुमराह खेळणार का? ‘या’ दिवशी बीसीसीआय घेणार अंतिम निर्णय