कॉमनवेल्थ गेम्स 2026! साक्षीचे सुवर्णपदक, भारताच्या बॉक्सिंगमधील सुवर्णहॅट्ट्रिक

निर्णायक तिसऱ्या फेरीत भारतीय खेळाडूने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत ५-० अशा एकमताने विजय मिळवला आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.

News Photo   2026 08 01T214932.836

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताच्या (Commonwealth) बॉक्सिंग संघाने आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली आहे. महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या साक्षीने इंग्लंडच्या रुबी व्हाईटचा ५-० अशा एकमताने  पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

या विजयासह भारताने बॉक्सिंगमध्ये तिसरे सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी प्रीती आणि जॅसमिन लांबोरिया यांनीही आपल्या-आपल्या अंतिम सामन्यांमध्ये विजय मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली होती. दुसरीकडे, जादुमणी सिंह याला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारताला बॉक्सिंगमध्ये दुसरे सुवर्ण! जैस्मिनने राष्ट्रकुल स्पर्धेच्या माजी विजेत्या मायकेला वॉल्शवर 5-0 ने नमवलं

अंतिम सामन्यात साक्षीने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. पहिल्या फेरीत तिने सर्व पंचांची मते आपल्या बाजूने मिळवत ५-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत इंग्लंडच्या रुबी व्हाईटने एका पंचाला प्रभावित केले, मात्र साक्षीने ही फेरी ४-१ अशा गुणांनी जिंकली. निर्णायक तिसऱ्या फेरीत भारतीय खेळाडूने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत ५-० अशा एकमताने विजय मिळवला आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.

यापूर्वी उपांत्य फेरीतही साक्षीने कॅनडाच्या अॅम्बर-जेन वॉल हिचा ५-० अशा एकतर्फी फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यातील प्रभावी कामगिरीमुळे साक्षीने भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णाची भर घालत भारतीय बॉक्सिंगची दिमाखदार कामगिरी कायम राखली.

follow us