IND vs NZ 3rd ODI : रोहित-शुभमनचे वादळ! चौकार-षटकारांची आतिषबाजी करत झळकावली शतके

IND vs NZ 3rd ODI : रोहित-शुभमनचे वादळ! चौकार-षटकारांची आतिषबाजी करत झळकावली शतके

IND vs NZ: इंदूर येथे वनडेमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. (Indore ODI) टीम इंडियाचे सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी धमाकेदार सुरुवात केली. (India Vs New Zealand) दोन्ही फलंदाजांनी झंझावाती शतके झळकावली, (Rohit Sharma) मात्र त्यानंतर बहुतांश फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. (Shubman Gill) मात्र, एकेकाळी टीम इंडिया 400 धावांचा टप्पा सहज पार करेल, असे वाटत होते, मात्र मधल्या काळात सातत्याने विकेट गमावल्यामुळे टीम इंडिया केवळ 385 धावांपर्यंतच पोहोचू शकली. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

रोहित शर्माने 85 चेंडूत 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याचवेळी शुभमन गिलने 78 चेंडूत 112 धावांची खेळी केली. या युवा सलामीवीराने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 5 षटकार ठोकले. याशिवाय अष्टपैलू हार्दिक पंड्याने 38 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले. तर विराट कोहलीने 36 आणि शार्दुल ठाकूरने 25 धावा केल्या. याशिवाय ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर हे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. वास्तविक, भारतीय संघ 26 षटकात एकही विकेट न गमावता 212 धावा करून 400 धावांच्या आकड्याकडे वाटचाल करत होता, मात्र सतत पडणाऱ्या विकेट्समुळे टीम इंडियाला केवळ 385 धावांपर्यंतच मजल मारता आली.

दुसरीकडे, न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा विचार केला तर, ब्लेअर टिकनर हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. या गोलंदाजाने 10 षटकांत 76 धावांत 3 खेळाडू बाद केले. याशिवाय जेकब डफीला 3 यश मिळाले. जेकब डफीने 10 षटकांत 100 धावा देत 3 बळी घेतले. तर मायकेल ब्रेसवेलने 4 षटकात 51 धावा देत रोहित शर्माची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. मात्र, न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी 386 धावांची गरज आहे. मात्र, टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत न्यूझीलंडचा सफाया करायला आवडेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube