भारताविरुद्धच्या टी20 आणि वनडेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर
नवी दिल्ली : भारत विरुद्ध श्रीलंका भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 सामने होणार आहेत. यानंतर 10 ते 15 जानेवारी दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. श्रीलंका क्रिकेट निवड समितीने आगामी मालिकेसाठी २० सदस्यीय संघाची निवड केली.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका भारत दौऱ्यावर येणार आहे. यासाठी बुधवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 20 सदस्यीय संघाची घोषणा केली. दासुन शनाकाची टी-20 आणि वनडेसाठी कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच वेळी, अष्टपैलू वानिंदू हसरंगा याला 3 जानेवारी 2023 पासून भारताविरुद्धच्या T20I मालिकेसाठी श्रीलंकेचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. कुसल मेंडिस वनडेत उपकर्णधार असेल.
भानुका राजपक्षे आणि नुवान तुषारा हे फक्त T20I मालिकेत खेळतील, तर नुवानिडू फर्नांडो आणि जेफ्री वँडरसे हे फक्त एकदिवसीय मालिकेत खेळतील. कुसल मेंडिसची वनडे मालिकेसाठी उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दासून शनाकाला कर्णधार बनवण्यात आले आहे.
श्रीलंका संघ : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस (एकदिवसीय उपकर्णधार), भानुका राजपक्षे (केवळ टी-२०साठी), चारिथ अस्लांका, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा (टी-२० साठी उपकर्णधार) अशेन बंडारा, महेश टेकशाना, जेफ्री वेंडरसे (फक्त एकदिवसीयांसाठी), चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशंका, कसून रजिथा, नुवानिडू फर्नांडो (केवळ एकदिवसीय सामन्यांसाठी), दुनिथ वेलाज, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा (केवळ टी20साठी)
भारतीय संघ (टी-20): हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, शुबमन गिल. उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
भारतीय संघ (वनडे)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद.. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.