Team India डोपिंगच्या विळख्यात? स्टिंग ऑपरेशनमधून खळबळजनक दावे

  • Written By: Published:
Untitled Design

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय संघाचे (Team India) खेळाडू हे नेहमी फिट राहण्यासाठी खास इंजेक्शन (doping) घेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारताचे कोणते खेळाडू फिटनेस वाढवण्यासाठी इंजेक्शन घेतात, हेदेखील चेतन शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या दाव्याने क्रिडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

भारतीय संघ डोपिंगच्या (उत्साहवर्धक इंजेक्शन) विळख्यात अडकल्याचं चेतन शर्मा यांनी सांगितलं. टीम इंडियातील अनेक खेळाडू स्वत:ला फीट ठेवण्यासाठी इंजेक्शन घेतात. ही बाब बीसीसीआयला माहीत असूनही क्रिकेट बोर्डाकडून याकडे कानाडोळा केला जातो, असा धक्कादायक खुलासा चेतन शर्मा यांनी केला आहे.

BBC IT Raids : लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर.., उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

भारतीय संघात खेळण्याच्या लालसेपोटी हे खेळाडू अनफिट असूनही फिटनेस चाचणीपूर्वी अशी इंजेक्शन्स घेतात, ज्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढते आणि डोपिंग चाचणीही त्यांना पकडत नाही. या विशेष प्रकारच्या इंजेक्शनच्या आधारे ते ही फिटनेस चाचणी उत्तीर्ण होतात, असंही ते म्हणाले. ‘झी न्यूझ’ने छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने चेतन शर्मा यांचं हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे.

दरम्यान, चेतन शर्मा यांनी केलेले खळबळजनक खुलासे हे भारतीय क्रिकेटसाठी ही गंभीर बाब आहे. पण या सर्व प्रकणात आता बीसीसीआय नेमकं पुढे काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण बीसीसीआय आता या खेळाडूंविरोधात कडक पाऊल उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Tags

follow us