आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेला सुरुवात
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून म्हणजेच 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेद्वारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आगामी विश्वचषक 2023 च्या तयारीला सुरुवात करेल. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमी सारखे वरिष्ठ खेळाडू वर्षातील पहिल्या वनडे मालिकेत पुनरागमन करत आहेत.
यंदा हे सर्व स्टार खेळाडू प्रत्येक एकदिवसीय सामना खेळताना दिसतील अशी अपेक्षा आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या रूपाने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. जेव्हा भारताने या मालिकेसाठी संघ जाहीर केला तेव्हा बुमराह त्याचा भाग नव्हता, परंतु जेव्हा एनसीएने त्याला तंदुरुस्त घोषित केले तेव्हा बीसीसीआयने त्याला संघात स्थान दिले.
पण मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी बातमी आली की या भारतीय वेगवान गोलंदाजाला नेटमध्ये सराव करताना आराम वाटत नव्हता, त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देणे चांगले मानले. आजच्या सामन्यात रोहित शर्मासमोर खेळताना 11 जणांची निवड करणेही मोठी समस्या असेल. दरम्यान या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीच्या बरसापरा स्टेडियमवर खेळला जणार आहे
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.
श्रीलंकेचा संघ : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, कासून, महाराणी, महाराणी, नुवानिंदू फर्नांडो, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.