हॉकी विश्वचषकाचा थरार आजपासून होणार सुरू

हॉकी विश्वचषकाचा थरार आजपासून होणार सुरू

नवी दिल्ली : 15व्या हॉकी विश्वचषकाचा थरार आजपासून (13 जानेवारी) सुरू होत आहे. अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. आज भारतीय संघ स्पेनशीही भिडणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील कांस्यपदक विजेता आणि राष्ट्रकुल 2022 च्या उपविजेत्या भारतीय संघाचा या सामन्यात स्पष्टपणे वरचष्मा असेल.

विश्वचषकाचे यजमानपद भूषवणाऱ्या भारतात या स्पर्धेचे सामने आजपासून ओडिशामध्ये सुरू होत आहेत. विश्वचषकाचा हा 15वा मोसम आहे. 48 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा भारताला दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळणार आहे.

इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनद्वारे आयोजित पुरुष हॉकी विश्वचषक सामन्यात आज भारत स्पेनविरुद्ध पदार्पण करणार आहे. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमप्रीत सिंग आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघ आज स्पेनच्या खेळाडूंशी भिडणार आहे. भारताने यापूर्वी पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत केवळ एकदाच हॉकी विश्वचषक जिंकला आहे. 1975 मध्ये देशाला हा विजय मिळाला. त्यानंतर भारताला आतापर्यंत दुसरा विश्वचषक जिंकता आलेला नाही.

भारत आणि स्पेन यांच्यात आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. यातील 6 सामने अनिर्णित राहिले आहेत, उर्वरित 24 पैकी 13 भारताने जिंकले असून 11 सामने स्पेनने जिंकले आहेत. गेल्या पाचपैकी दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत. FIH प्रो हॉकी लीगमध्ये 6 नोव्हेंबर 2022 रोजी दोन्ही संघांची शेवटची टक्कर झाली, जिथे सामना 2-2 असा बरोबरीत संपला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube