Video : कॅप्टन कूलचा सुपरकूल अंदाज, धोनीचा बाईक रायडिंचा व्हिडीओ व्हायरल

Video : कॅप्टन कूलचा सुपरकूल अंदाज, धोनीचा बाईक रायडिंचा व्हिडीओ व्हायरल

MS Dhoni Riding Bike : इंडियन क्रिकेट टिमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कोणत्या न कोणत्या कारणानं माध्यमांमध्ये चर्चेत असतो. त्यातच आता धोनीचा बाईक रायडिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसं बाईक आणि कारवरील प्रेम कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. त्याच्याकडे विविध प्रकारच्या बाईक्सचे कलेक्शन आहे. नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धोनीच्या बाईकचे कलेक्शन दिसून आले आहे. ते एखाद्या शोरुमपेक्षाही मोठे दिसत आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Masoom The Next Generation चित्रपटाचा येणार सीक्वल; अभिनेत्रीने पोस्ट करत म्हणाली…

एमएस धोनी रांचीमध्ये बाईक राईडचा मनमुराद आनंद लुटताना दिसून आला. या व्हायरल व्हिडीओमध्ये धोनी त्याच्या फार्म हाऊसमध्ये जात असल्याचे दिसून येत आहे. माहीचा व्हायरल होणारा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे. लोकांनी त्यांना भरभरुन प्रेम दिले आहे. त्या व्हिडीओमध्ये धोनी त्याची बाईक घेऊन येतो आणि थेट त्याच्या फार्महाऊसवर जातो.

महेंद्रसिंग धोनी साधारण जीवन जगण्यासाठी ओळखला जातो. नुकताच माहीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामध्ये धोनी एका सामान्य माणसाप्रमाणे रस्त्यावर कारमध्ये बसून दिशा विचारताना दिसून आला होता. दुसरीकडे धोनी बऱ्याचदा इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करतानाही पाहायला मिळाला. त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाल्याचे पाहिले आहेत.

PM Modi Speech ; पंतप्रधानांच्या भाषणात कोणता शब्द किती वेळा? भारत- 110, विश्व- 63 आणि परिवारजन- 48 वेळा उल्लेख

माही बहुदा सोशल मीडियापासून लांब राहतो. या कारणास्तव त्याची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच आतुर असल्याचे पाहायला मिळाले आहे.

एमएस धोनीचे रांचीमध्ये मोठे फार्म हाऊस आहे. धोनीचे हे फार्म हाऊस सुमारे सात एकरामध्ये पसरलेला आहे. धोनीने या फार्म हाऊससाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचं सांगितलं जात आहे. अनेकवेळा तो त्याच्या सुट्ट्यांसाठी फार्म हाऊसवर जातो.

त्याच्या फार्म हाऊसला टीम इंडियाचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांनी देखील भेट दिली आहे. तर धोनीची पत्नी साक्षी देखील सोशल मीडियावर फार्म हाऊसचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube