राजकारणातून थेट नेमबाजीच्या मैदानात; विक्रम काकडेंचा जुन्या आवडीकडे वळण्याचा निर्णय

Vikram Kakade : महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे पुन्हा नेमबाजीच्या मैदानात उतरणार असून, त्यांनी सराव सुरू केला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 28T193001.060

महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे (Pune) पुन्हा एकदा नेमबाजीच्या मैदानात उतरणार आहेत. नवी दिल्ली येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्यांमुळे काही काळ नेमबाजीपासून दूर राहिल्यानंतर काकडे यांनी आता आपल्या जुन्या आवडीकडे पुन्हा वळण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमबाजी हा काकडे यांचा अनेक वर्षांपासून आवडीचा खेळ असून त्यांनी यापूर्वी नियमित सराव केला आहे. मात्र राजकीय आणि सार्वजनिक कामांमुळे त्यांना या खेळासाठी वेळ देता आला नाही. आता राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा बंदूक हाती घेतली असून आगामी स्पर्धेसाठी स्वतःला तयार करण्यावर त्यांचा भर आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणूक; तीन टर्म आमदार सतीश चव्हाणांची वाट भाजप अडविणार ?

काकडे यांनी नुकतीच टेंभुर्णी येथील माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे सुपुत्र आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज यशवंत शिंदे यांच्या ट्रॅप आणि स्कीट नेमबाजी केंद्राला भेट दिली. यावेळी संजय मामा शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. या केंद्रात काकडे यांनी नेमबाजीचा सरावही केला. या निमित्तानं जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं असून आगामी स्पर्धेसाठी सराव अधिक नियमित करण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्या सरावाचं वेळापत्रक आता अधिक व्यस्त होणार आहे. नेमबाजी ही केवळ स्पर्धा नसून अनेक वर्षांपासून जपलेली आपली आवड असल्याचं त्यांनी सांगितलं. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळत ही आवड पुन्हा जोपासण्याचा प्रयत्न असल्याचं काकडे यांनी स्पष्ट केलं असून दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागलं आहे.

follow us