Vinesh Phogat Case : बृजभूषण शरण सिंहविरोधात विनेश फोगाटसह 7 पहिलवान सुप्रीम कोर्टात
Vinesh Phogat On Brujbhushn sharan Sing : गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पहिलवान विनेश फोगाटसह अनेक पहिलवानांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर हे उपोषण सुरू होतं. त्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याच्या अश्वासनानंतर हे उपोषण थांबलं होतं.
भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआई) चे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरूद्ध लैंगिक शोषणाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्या विरोधात हे पहिलवान मैदानात उतरले होते. दरम्यान कुस्तीपटूंच्या तक्रारी सोडवण्याच्या पहिल्या टप्प्यात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले.
मात्र आता पुन्हा भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या विनेश फोगाटसह बजरंग पुनिया, संगीता फोगाट, सोनम मलिक आणि अंशू मलिक यांसारखे पहिलवान उपोषणाला बसले होते. सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर देखाल करून न घेतल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेमध्ये सांगण्यात आलं आहे की, 21 एप्रिलला कॅनॉट प्लेस ठाण्यामध्ये उशीरापर्यंत तक्रार दाखल करण्यासाठी बसलो होतो मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. तर या विरोधात सुप्रीम कोर्टात रविवारी उशीरा याचिका दाखल केल्याने तिच्यावरील सुनावणीसाठी वेळ लागणार आहे.